रायगडावर मी जेव्हा पाऊल ठेवले
अभिमानाने माझे तर उर भरले
डोळ्यात अश्रू अचानक दाटून आले
राज्यांच्या समाधीवर शीर झुकले
पाहुनी रायगड सारा डोळे दिपले
वाचलेले इतिहासातील सारे खरे वाटले
शिवराज्य पुन्हा समोर उभे राहिले
पाहुनी पुतळा राजांचा गहिवरून आले
निघताना रायगडावरून पाय जड झाले
येईन पुन्हा भेटीस मी रायगडाला सांगितले
कवी – निलेश बामणे
— निलेश बामणे
Leave a Reply