नवीन लेखन...

“रोमहर्षक ढाक बहिरी ट्रेक”

 

भरपूर भटकून झाल होत. ह्या वीकेंड ला मस्त आराम करणार होतो. शनिवारी रात्री जेवण करून, लवकर दहाच्या सुमारास मी ब्लँकेटमध्ये गुडुप झालो. रविवारी सुट्टी असल्याने, मी लवकर उठणार नव्हतो.रविवारचे सकाळचे आठ सारे आठ वाजले असतील. सकाळ सकाळी आमच्या बाजीराव पेशवे चा फोनेआला. त्या वेळेस मी गाढ झोपेत होतो, कदाचित काही स्वप्न बघत होतो, तोच मी दचकून उठलो. बेड च्या बाजूला टेबल वर ठेवलेला माझा N ७३ वाजत होता. फोन उचलला आणि मी हेलो म्हणून मी बोलायला सुरवात केली. काय करतो आहेस आज, आस सोमनाथ ने मला विचारल मी सांगितलं कि काहि नाही आराम करणार आहे . तो मला म्हणाला की जायचं का ढाक-बहिरी ला. ठीक आहे तू आवरून ये घरी, आपण जावू मी आस सांगितलं. मी आवरायला सुरवात केली. थंड पाण्याने अंघोळ आपटून बाप्पा च्या पाया पडलो . नंतर मी माझ्या विचारात चहा पित पित, मी सर्व तयारी करून सोमनाथ ची वाट बघत बसलो होतो.थोड्या वेळातच मला होर्न चा आवाज आला, आणि बाहेर येवून बघतोय तर काय आमचे सोमनाथ रावांच आगमन झालेल होते.. मग काय जास्त विचार न करता आम्ही निघालो, पुणे-मुबई हायवे मार्गाने ढाक बहिरी च्या दिशेला. नास्ता करण्या साठी सोमाटणे फाटे जवळ थोडा वेळ थांबलो . गरमागरम चमचमीत वडा-पाव आणि चहा वर ताव मारला. सोमनाथ चा एक मित्र आहे विनायक म्हणून, त्याने त्याला बोलावून घेतले. तो पण आमच्या सारखाच दुर्गवेडा होता.ढाक बहिरी साठी कामशेत वरुतून एक मार्ग आहे, आम्ही कामशेत कडे चाललो होतो. आम्ही कामशेत मध्ये पोहचलो. कामशेत मध्ये पोहचल्या की डाव्या बाजून वळून तो रस्ता मग ढाक बहिरी कडे जातो.वळण घेवून पुढे जात असताना एक railway ट्रेक मधी येतो.

 

तिथून ट्रेन जाणार होती, म्हणून आम्हाला तिथे थोडा वेळ ट्रेन जाई पर्यंत थांबव लागल . मनात खूप असे विचार चालू होते. ढाक-बहिरी बद्दल खूप ऐकून होतो की.खूप कठीण चढण आहे, खूप कस लागतो वगैरे वगैरे.पण घाबरून जाईलतो दिपक कसला? 🙂 (हे मोठेपणाचे वाक्य नव्हे सत्य परिस्थिती आहे) ट्रेन आमच्या समोरून गेली. ट्रेन च्या गती पेक्षा मनाच्या विचारांची गती जरा स्तच होती. रेल्वे ट्रेक ओलांडून आम्ही ढाक दिशेन निघालो. रस्त्यात तुंगार्ली ” वादिवले धरण ” लागते, हे आपण बरोबर रस्त्यावर असल्याचा संकेत समजावा! एक-दीड तासांनी आम्ही जांभिवली अगदी छोटं गाव आहे तिथे पोहचलो . ५० घरं असावीत, एका दुकानवजा घरा जवळ आम्ही आमच्या गाड्या पाण्याच्या बोतल घेतल्या. आणि चालायला सुरुवात केली.

जांभिवली गावातून सुरुवातीचा अर्धापाऊण तास तुरळक झाडी लागत होती.रस्त्याच्या दोन्ही बाजूला करवंदाची आणि आंब्याची झाडं. ऊन कडक व्हायला लागले होते. पण मधून मधून ढगही येत होते त्यामुळे फारसा त्रास होत नव्हता. वाराही जोरदार सुटला होता. एक पठार चढून वर आलो आणि मग ढाकचा सुळका दिसायला लागला. थोडा वेळ विश्रांती घेतली.आणि पुढे निघालो . नंतर हळूहळू ढाकचा ट्रेक कसा अवघड आहे याच्यावर चर्चेची गाडी आली..

अंदाजे एक – दिड तास जंगलवजा झाडीतुन चालल्यानंतर ढाकच्या गुहेच्या आधी येणारी खाई येते.

 

 

आता आम्ही खिंडीच्या ऐन माथ्यावर उभे होतो.दोन्ही बाजूना उंच डोंगर आणि त्यामधुन ही चिंचोळी पट्टी खाली उतरत गेली आहे.

 

 

 

आणि हो येथुनचा पुढच्या साहसी वाटचालीला सुरुवात होते. पुढच्या वाटचाली आधी आम्ही थोडी रेस्ट करण्याचे ठरवुन, जरा आडवे झालो. एक दहा पंधरा मिनिट आम्ही तिथे रेस्ट घेतली असेल. खिडीच्या सुरुवातीला अगदीच सोपी वाटणारी ही छोटीशी वाट दुसर्‍या टोकाला अगदीच निमुळती आहे.

८-१० मीटरची ही खिंड माणुस जेमतेम मावेल अशी आहे. अगदी आपल्या पोटाचा अंदाज करुन देणारी! हळु आणि सावधानतेने आम्ही सारे खाली उतरलो. उजव्या बाजुला प्रचंड कडा आणि खाली खोल खाई. नविन भटक्यांचे अगदी डोळे फिरवेल अशी.

त्या कड्याच्या बाजुने जाणारी छोटीशी पायवाट बहिरीच्या गुहेकडे जाते. अंदाजे ५०-६० मी. असणारी ही वाट पार करणे म्हणजे दिव्यच वाटते. वाट आणि खाली दिसणारी खोल दरी यांचा मध्य साधुनच ही वाट पार करावी लागते.

आता पर्यंत अगदीच नॉर्मला वाटणारा ट्रेक आता हळु – हळु डेंजरस व्हायला लागला होता!

trbidi=”on”>काळ्या पाषणावर काही ठीकाणी ट्रेकर्सनी क्लिप लावल्या आहेत. त्या वाटेवर सापडणारी खाच आणि त्या क्लिप्स एवढेच! हा पॅच पार केल्यानंतर अंदाजे ८-१० मी. चा उभा पायर्‍या असणारा पॅच लागतो.

इथे मात्र मनाची जोरदार तयारी लागते. स्वत:वरचा आत्मविश्वास किंचितही कमी होऊ न देता हा पॅच पार करावा लागतो. वरती पोहचताच भैरवनाथच्या दारात लावलेले झेंडे दिसतात.


height=300 h5=”true”>

त्याखाली शिडीच्या नावाने उभे असणारे फांदीचे लाकुड आणि दोन-तीन लोंबकळणारे दोर! आता त्या दोरांपर्यंत पोहचण्यासाठी पुन्हा एक छोटाशी वाट आहे…आता शिडीपर्यंत पोहचण्यास एक आधार झाला होता. काळजी घेत – घेत आम्ही एक एक वर वर येत चढत होतो .

दोरीच्या दुसर्‍या टोकाला पोहोचल्या नंतर त्या फांदी कापलेल्या लाकडावरुन – लोंबकळणारा दोर पकडुन वरती जायचे होते. हा पॅच अगदीच कठीण होता. स्वतःबरोबर मला आता भैरवनाथ वरही विश्वास ठेवणे जरुरी होते.कडा चढताना ‘पोटात गोळा येणे’, ‘आईचे दूध आठवणे’ असे वाक्प्र्चार प्रत्यक्ष अनुभवता येतात.

त्या लाकडावर उभे राहुन – दोर हातात पकडुन एक नजर खाली टाकली तर भल्या – भल्यांचेही डोळे फिरतील अशी अवस्था होते. पाठीवरची सॅक संभाळत आम्ही एक – एक जण वरच्या गुहेत पोहोचलो. अगदी शेवटचा पायरी ओलांडुन मी भैरवनाथ च्या समोरच उभा राहिलो होतो . अंदाजे २.३० वाजता आम्ही सारे सुखरुप वरती पोहोचलो.

भैरवनाथ हा तसा कोणताही खास असा आकार नसणारा हा देव! – एक भल्या मोठ्या दगडाला शेंदुर लाऊन त्यावर डोळे लावलेले… डोळ्यात पाहता अगदी तुमच्या समोरच उभे असळ्याची जाणीव करुन देणारा. बाजुलाच नवसाचे त्रिशुल लावलेले. आसपास उदबत्त्या आणि हळद – कुंकु. बाजुला. मी देवाचा आशीर्वाद घेऊन काही काळ गुहेतच विश्रांती घेतली.

हीच गुहा दोन भागात वाटलेली आहे. एका गुहेत मंदिर, पाण्याचे टाके आणि साधरण तीस जणांची रहायची व्यवस्था असलेली दुसरी गुहा. काही दिवसापूर्वी माझ्या वाचनात आले होते ढाकचा भैरवनाथ देव रागीट आणि तापीटही आहे. त्याला मुली-स्त्रियां मंदिरात आलेल्या चालत नाहीत. त्याची प्रचीती त्या दिवशी आली . पाण्याचे भले मोठे टाके. त्यावर तरंगणारी आणि काही बुडलेली भांडी.

याच भांड्याचा वापर करुन तिथे जेवण तयार करता येते. वापरुन झाल्या नंतर स्वच्छ करुन परत तिथेच ठेवण्याची पध्दत. त्यांची चोरी करणे म्हणजे भैरवनाथच्या कोपाला आमंत्रण देणे आहे. असे करणर्‍यास भैरवनाथ समोरच्या खाईत लोटुन देतो अशी भावना आहे, आणि ती वर्षानुवर्षे कायम आहे!

गुहेतून दूरपर्यंत विस्तृत प्रदेश नजरेत भरतो. साधरणता दीड ते दोन तास आम्ही त्या गुफान मध्ये होतो.निसर्गाच सोंदर्य आम्ही अनुभवत होतो आणि कॅमेरात त्या सोंदर्य ला टिपून घेत होतो .असा हा निसर्गरम्य परिसर सोडुन जाण्याचे कोणाचे मन होत नव्हते.विश्रांतीनंतर आता खाली उतरायचे टेंशन यायला लागले होते. कोणत्याही ट्रेक मध्ये चढयापेक्षा उतरणेच फार कठीण जाते, याचा अनुभव आम्हा सर्वांनाच होता.

मी प्रथम खाली उतरायला सुरुवात केली आणि माझ्या मागो माग सोमनाथ आणि विनायक हे होते. ज्या दोरी ला पकडून मी वर आलो होतो, आता त्याच दोरीला पकडून मी खाली उतरत होतो .चढताना आपल्याला पाय किंवा हात कोठे ठेवायचा हे डोळ्यांनी दिसते, पण खाली उतरताना पाय कुठे ठेवायचा काही कळत नव्हते .उतरताना उभा कडा असल्याने पायाची जागा चाचपून, मग मी पाय खाली टेकवत होतो . पाय घसरण्याच्या भीती मुळे मी दोरी खूप घट्ट पकडली, आणि भैरवनाथ चा चांगभले म्हणून आम्ही हळू हळू खाली उतरत होतो.उतरताना जिवाचा थरकाप होत होता. गुहेतून खाली उतरलो त्यावेळी पाच वाजून गेले होते. परतिचे आम्हाला वेध लागले होते.

संध्याकाळ झाली होती. आम्ही ज्या गावात आमच्या गाड्या पार्क जशी आम्हाला थोडी थोडी पावूल वाट दिसत होती, त्या वाटेने आम्ही पुढे चालत होतो . सुर्य मावळतीला झुकत होता, आणि आमच्या मनातील भीती अजून वाढत होती. कि अजून कसे गाव दिसेना. आम्ही ज्या पावूल वाटेने चालत होतो, ती पावूल वाट एका दरी जवळ येवून थाबली. तसा माझा धीर थोडा आणि छातीतली धडधड वाढत गेली होती. मी चारही दिशांना माझी नझर फिरवली सगळी कडे झाडीच झाडी होती. आणि डाव्या हाताच्या बाजूला एक जुनी पावूल वाट माझ्या नजरेला पडली. त्या पावूल वाटे वरून जावू आस आम्ही सर्वांनी ठरलं, आणि त्या पावूल वाटेने, आम्ही बरोबर गावा जवळ पोहचलो . आणि पूर्ण अंधार पसरला होता.

एका साहशी ट्रेकची अनुभुती आणि प्रचंड निसर्गातल्या एका रौद्र देवतेचे दर्शन घेऊन सुखरुप परतल्याचे समाधान सार्‍यांच्या चेहर्‍यावर दिसत होते.ख़रच इतर ट्रेक पेक्षा वेगळा, थरारक हा अनुभव होता.पण डोळ्यात समाधान होतं, काहीतरी आव्हान पेलून ते पुर्ण केल्याचं. थकलेल्या चेहर्‍यावर लढाई जिंकुन आलेल्या मावळ्यासारखा गर्व होता, आणि जिवंत परत आलो ह्या समाधानामुळे डोळ्यात पाणीही…

— कुमार.दिपक तरस

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..