प्रभातच्या १९४१ साली प्रदर्शित झालेल्या शेजारी या सिनेमातील हे गाणे आजही रसिकांच्या ओठांवर सहजपणे रेंगाळताना दिसते. या सदाबहार गाण्याला शब्दबद्ध केलं शांताराम आठवले यांनी. तर संगीत होतं मास्टर कृष्णराव यांचं. या गाण्याला स्वरबद्ध केले जयश्री व वसंत देसाई यांनी. या गाण्याचा कोरस अजूनही आपल्याला त्या सोनेरी-चंदेरी दुनियेची आठवण करुन देतो. प्रभात फिल्म कंपनीच्या या कोरस विभागातील कलाकार होते मा. छोटु, बालकराम, मा. परशुराम, जयश्री, माणिक दादरकर (वर्मा), कुमुदिनी पेडणेकर, प्रभा फुलंब्रीकर (वीणा चिटको), वसंत देसाई.
लख लख चंदेरी तेजाची न्यारी दुनिया
झळाळती कोटी ज्योती या, हा हा !
चला धरू रिंगण, चुडी गुढी उंचावून
आकाशीच्या अंगणात, मंजुळ रुणझुण
नाचती चंद्र-तारे, वाजती पैंजण
छुनछुन झुमझुम, हा हा !
झोत रुपेरी भूमिवरी, गगनात
धवळली सारी सृष्टी, नाचत डोलत
कणकण उजळीत, हासत हसवीत
करी शिणगार, हा हा !
आनंदून रंगून, विसरून देहभान
मोहरली सारी काया, हरपली मोहमाया
कुडी चुडी पाजळून, प्राणज्योती मेळवून
एक होऊ या, हा हा !
—
Leave a Reply