नेहमी ५-२५ माणसे दुकानात शिरली कि लगेच चला बकरा आला म्हणून अव्वाचे सव्वा दुकानदार आपल्याकडून पैसे वसूल करतो हा अनुभव बऱ्याच लोकांनी अनुभवलेला असेल किंवा ऐकला असेल.
चला कुठे पैसे आपल्याला द्यायचे म्हणून दोनही घराची मंडळी दाबून खरेदी करतात आणि रुपये १०००० मालाचे २०००० देऊन येतात. तुला न मला घाल ……………………. अशी अवस्था झालेली असते
पण यावर माझा एक अनुभव आहे बघा आपल्याला आवडतो का ?
१) जर आपल्याला बस्ता घ्यायचं असेल तर प्रथम ८ दिवस आधी आपण आणि आपले सबंधी (फक्त २-३ लोक) चार दुकानं फिरा. फक्त आधी कपडे बघून ठेवा काय घायचे ते निवडा दुकान निश्चित करा
२) जमल्यास भावाची यादी (कोटेशन) घेण्याचा प्रयत्न करा.
३) मग चार दुकानांची कोटेशन तपासून बघा. जिथे भाव कमी आहे तिथे पुन्हा जाऊन आपण घेणारा बस्त्याची तपासणी करून घ्या (Quality )
४) फक्त भाव कमी आहे म्हणून खरेदी करणे योग्य नाही. त्याबरोबर त्या वस्तूची Quality असणे गरजेचे आहे. नाहीतर संबंध खराब होऊ शकतात
५) आज महागाई फार वाढली आहे त्यामुळे सर्वांनाच बस्ता करणे शक्य नाही. त्यामुळे जास्तीत जास्त आपली जुनी परंपरा अवलंबा. म्हणजे आपली टावेल टोपी हो आणि शक्यतो हि होलसेल व्यापार्याकडूनच खरेदी करा
आणि आता जा बस्ता खरेदी करायला. आपल्यासोबत आपले नातेवाईक आप्तेसबंध (२०,२५,५० वाटेल
तेवढे) आणि बघा खरोखर फायदा होतो का ते
?
— सचिन सदावर्ते
Leave a Reply