साहित्य –
नाचणीचे पीठ – १/२ वाटी किसलेले गाजर – १/४ वाटी चिरलेला गुळ – १/४ वाटी दुध – २ वाट्या वेलची पूड – १/२ चमचा साजुक तुप – ४ चमचे
कृती –
१) कढईत तुप घालुन तापवावे २) गाजराचा किस परतुन शिजवावा ३) नाचणीचे पीठ घालुन मंद आचेवर परतावे ४) हळु हळु दुध घालुन ढवळत रहावे गुठळी होऊ देऊ नये. ५) गुळ घालुन ढवळावे, गुळ विरघळल्यावर एक वाफ आणावी, वेलची पूड घालावी.
टीप – लहान मुले व वृद्धांसाठी पौष्टिक
— सीमा कारुळकर
Leave a Reply