खुरडून जाते फुलझाड
गर्द झाडीच्या वनांत
कोमेजून चालली स्त्रीलज्जा
धावपळीच्या जीवनांत ।।१।।
भावनेची नाहीं उमलली
फूले तिची केव्हांही
नाजूकतेचे गंध शिडकूनी
पुलकित झाली नाही ।।२।।
कोमेजल्या भावना
साऱ्या हाताळल्या जाऊन
एकांतपणाची ओढ
दिसेल मग ती कोठून ।।३।।
गर्दीच्या ओघामध्यें
धक्के सततचे जेथे असे
प्रेम भावना जातां उडूनी
ओलावा मग रहात नसे ।।४।।
स्त्री लज्जेची भावना
जी युगानूयुगें जपली
उंबरठा ओलांडता
लोप पावूं लागली ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
e-mail- bknagapurkar@gmail.com
विवीध-अंगी ***१८
रक्ताच्या नात्यापेक्षा प्रेमाचे नाते श्रेष्ठ असू शकते
मुलीच्या आग्रही वागण्याने व सुनेच्या मृदु सिवभावाने ह्याची जाण येते
— डॉ. भगवान केशवराव नागापूरकर
Leave a Reply