“तिसरी कसम’ या चित्रपटाचे चित्रीकरण बिहारमधील पूर्णिया जवळच्या जंगलात सुरू होते. दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांना अगदी पहाटेचे एक दृश्य चित्रित करायचे होते म्हणून त्यांनी नायक राजकपूर यांच्या स्वीय सहाय्यकाला दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचला हजर राहण्यास सांगितले.
त्याने राजकपूरना हा निरोप देण्यास साफ इन्कार केला. “त्यांचा दिवस सकाळी अकरा वाजता सुरू होतो हे मला ठाऊक असताना माझी हिंमतच होणार नाही त्यांना पहाटे या म्हणून सांगायला.’
मग दिग्दर्शक बासू भट्टाचार्य यांनीच ते काम स्वीकारले. ते राजकपूरला म्हणाले, “उद्या मला दोन मोठ्या लोकांना बरोबर घेऊन काम करायचे आहे. वेळ पहाटे साडेपाचची आहे. मात्र, ती चुकली तर त्यातला एक मोठा माणूस निघून जाईल… एक मोठा माणूस म्हणजे साक्षात् सूर्यनारायण व दुसरे आपण स्वत: आहात.’
दुसऱ्या दिवशी पहाटे साडेपाचला सर्वांच्या आधी राजकपूर स्वत: पोहोचलेले होते. एवढेच नाही तर संपूर्ण युनिटसाठी त्यांनी चहादेखील तयार ठेवलेला होता. सर्वांना शरमल्यासारखं झालं. राजकपूर कामात आपलं भान हरपून जातात हे साऱ्यांना पुन्हा एकदा कळलं.
कथा उपदेश : मोठी माणसं आपल्या कामाला नेहमी सर्वोच्च अगक्रम देतात.
— दीपक गायकवाड
Leave a Reply