|| हरि ॐ ||
उन्हाच्या काहिलीने झाले होते वातावरण तप्त,
भेगाळलेली जमीन सोशीत होती चटके उन्हाचे,
सुटका हवी होती वसुंधरेला रणरणत्या उन्हापासून
डोळे लाऊन बसली होती वसुंधरा वरुनाकडे कधीचे!
वातावरणात वाढलेली आद्रता आणि
घामेजलेली शरीरे देत होती संकेत पावसाचे,
वातावरण निर्मितीत कोण धरणार हात निसर्गाचे?
आणि आचानक रविवारी झाले आगमन पावसाचे!
तप्त झालेल्या वसुंधरेची तगमग बघवत नव्हती त्याला,
५ जून जागतिक पर्यावरण दिन साजरा करायला
यायचेच होते त्याला!
मातीच्या सुगंधाने त्याच्या आगमनाची चाहूल लागली,
आलेल्या विलक्षण गारव्याने हवेत थंडाई पसरली,
बच्चे कंपनीच्या चेहेऱ्यावर रंगांची उधळण झाली !
झाडे, लता-वेली आनंदाने डोलू लागली,
सर्वांचेच अंग झाले होते ओलेचिंब, अंगा अंगाचा दाह झाला होता टिंब!
गवताच्या पाती न पातीने लववून केला सलाम वरुणाला,
आता तरी सतत मिळूदे तुझी करुणा आम्हांला!
जगदीश पटवर्धन, बोरिवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply