हल्ली चुकतात ठोके हृद्याचे
नाव ऐकताच कोणत्याही वर्गणीचे…
होते वर्गणी दिल्यामुळे भले
सदाच वर्गणी गोळा करणार्यांचे…
जास्तीची वर्गणी गोळा करणारेच
पुढे गिरवितात धडे राजकारणाचे…
आजकाल वर्गणीवरच होतात उभे
सुवर्ण महाल अलिशान कित्येकांचे…
या वर्गणीमुळेच पडतात मुडदे
काही शहरात अनेक तरूणांचे…
वर्गणी गोळा करता करता
कित्येकांस मिळते ज्ञान धंद्याचे…
पण वर्गणी गोळा करणारेही
आता शिकार ठरतात वर्गणीचे…
— निलेश बामणे
Leave a Reply