बासरी – चिरकाल प्रेमात असलेली प्रेयसी.
कधी नुकतीच प्रेमाशी ओळख झालेली मुग्धा,
कधी प्रियकराच्या मीलनासाठी निघालेली अभिसारिका,
कधी विरहाने व्याकुळ झालेली विरहिणी
तर कधी त्या कृष्णाशी एकरूप झालेली राधा. प्रेमाचे वेगवेगळे आविष्कार.
जलतरंग – मूर्तीमंत आशावाद.
जीवनरसाने ओथंबलेला.
सगळ्यात आनंद शोधून थुई थुई नाचणारा.
हा आनंद आणि आशावाद पण दुस-याला सहज लागण करणारा.
ह्याच्या सहवासात आल्यावर नैराश्य आपोआप दूर पळून जाते आणि मन आशावादी बनते.
व्हायोलीन – जलतरंगाच्या विरुद्ध स्वभाव.
जणू दु:खाचे आकर्षण असल्यागत वागणारा. दु:ख स्वत:चे असो वा दुस-याचे.
हा स्वतःच आर्त होणार.
गिटार – चिरतरूण. कुठल्याही गॅदरींगचा केंद्रबिंदू.
पार्टीत स्वत: नाचून दुस-यांचे पायही थिरकवणार. तितक्याच सहजतेने एकांतात प्रेमाच्या आणाभाका घेणार.
सतार – अतिशय भावनाशील.
कुठलीही भावना उत्कटपणे, भरभरून, झरझरून बाहेर येणार असा स्वभाव.
मग तो आनंद असो, गहिवर असो ,
दु:ख असो – किंवा भावनांचा महापूर.
तबला – डग्गा –
जणू दोन मित्र गप्पा मारायला बसलेत. विषयांचा आवाका अफाट –
आंतरराष्ट्रीय राजकारण व अर्थकारण, क्रिकेट , सिनेमा, नट नट्या , प्रवास , ऑफीस – काहीही असो .
विषय व मूड आणि भावनांची तीव्रता ह्यावर अवलंबून असलेले बोल.
नगारा – एकच मूड – मस्तीचा .
कायम कशाचे तरी सेलीब्रेशन आणि त्यासाठी नाचायची नी नाचवायची तयारी.
ढोलक – अवलिया व्यक्तिमत्व.
आसक्ती आणि विरक्ती या दोन परस्पर विरोधी धृवांवर सारख्याच तन्मयतेनी व रसिकतेनी वागणारा –
म्हणून , लावणी आणि भजन !
कुठेही फिट्ट होतो.
पेटी – ही आहे मित्रमैत्रीणींची मैफिल. त्यातल्या काळ्या पांढ-या पट्ट्यांप्रमाणेच विभिन्न स्वभावाच्या मित्र मैत्रीणींची मैफिल.
प्रत्येकाचा स्वभाव वेगळा, क्षेत्र वेगळे पण एकत्र आले की खूप सुखद असा सुसंवाद ..!
स्वत:चे स्वतंत्रपण जपता जपता दुस-याला साथ देणारे मित्र मैत्रिणी म्हणजेच ही सुरेल वाद्य …!
WhatsApp वरील संगीत संगीत व फक्त संगीत या ग्रुपवरील श्री राजन सहस्त्रबुद्धे यांनी केलेले पोस्ट
Leave a Reply