नवीन लेखन...

वाद देवस्थानांच्या संपत्तीचा



अलीकडे समाज शिक्षित होत चालला आहे त्याबरोबर त्याची धार्मिक वृत्तीही वाढीस लागली आहे. त्यातून आर्थिक संपन्नता, वाहतुकीच्या सोयी आणि मिळणारा वेळ यामुळे देवस्थानला आवर्जून भेटी देणार्‍यांची संख्या मोठी आहे. त्याबरोबरच देवस्थानकडे देणग्यांच्या रुपाने येणाऱ्या पैशांचा ओघही वाढला आहे. पण या संपत्तीचा मूठभर पुजारी आणि मोजक्या विश्वस्तांकडून

मनमानीपणे केला जाणारा विनियोग चिंताजनक आहे.देवस्थानातील संपत्ती हा आपल्या समाजात नेहमी वादाचा आणि चर्चेचा विषय झाला आहे. महंमद गझनीने सोमनाथचे मंदिर हिंदू धर्माविषयी अनादार व्यक्त करण्यासाठी नव्हे तर तिथल्या पैशासाठी फोडले होते. कारण तिथे अमाप संपत्ती साठवली होती. गझनी या मंदिरावर अकरा वेळा चालून आला तरीही त्याला प्रत्येक वेळा तिथे भरपूर लूट मिळाली. आता तर आपल्या देशात धर्मभोळेपणाही वाढू लागला आहे आणि त्यापोटी देवासमोर संपत्तीच्या राशी ओतण्याची ऐपतही वाढत चालली आहे. लोकांची केवळ ऐपत आणि दानतच वाढली आहे असे नाही तर मंदिरांना वारंवार भेटी देण्याइतका प्रवास सुखाचा झाला आहे. त्यासाठीची प्रवासाची साधने वाढली आहेत आणि धार्मिक स्थळांना जाण्याइतकी लोकांना उसंतही मिळत आहे. मुख्य म्हणजे तितकी हौसही वाढली आहे. त्यामुळे अगदी किरकोळ वाटणार्‍या एखाद्या देवस्थानच्या दान पेटीतही हजारो रुपयांचे दान रोज जमा होत आहे. अशा दानाचे हिशेब कोणीही विचारत नाही आणि ते कोणी देतही नाही. यातील काही मंदिरे वैयक्तिक आहेत तर काही सार्वजनिक न्यासांच्या मालकीची आहेत.या सार्‍या अमाप संपत्तीतून नवे प्रश्न निर्माण होत आहेत. मुख्य म्हणजे देवस्थानाला मिळणार्‍या पैशामुळे त्यांच्यावर कब्जा मिळवण्यासाठी स्पर्धा सुरू झाली. आता तर त्यापायी राजकारणही होत आहे. मुख्य म्हणजे या पैशांचा विनियोग कसा करावा हासुंध्द
ा प्रश्न निर्माण झाला आहे. सर्वसाधारणपणे धार्मिक स्थळांवर व्यापार्‍यांची मोठी गर्दी होत असते. महाराष्ट्रात गेल्या ५० वर्षात शिर्डी, शेगाव, अक्कलकोट अशा नव्या तीर्थक्षेत्रांचा उदय झाला असून

तिथे दररोज हजारो भाविक येऊ लागले आहेत. साहजिकच अशा ठिकाणी आल्यानंतर काही खरेदी आवर्जून केली जाते. त्यामुळे संबंधित दैवतांचे फोटो, ताईत, यंत्रे, कॅसेट, लॅमिनेशन केलेल्या प्रतिमा, मूर्ती, पूजासाहित्य, पोथ्या, नारळ, आयुर्वेदिक औषधे, अशा कितीतरी वस्तू विकणार्‍या दुकानांची संख्या वाढत आहे. या वस्तूंच्या विक्रीतील म्हणजे व्यापारातील उलाढाल अक्षरश: लाखांनी असते. त्यामुळे अलीकडच्या काळात देवस्थाननी आपल्या परिसरात अशी दुकाने आणि व्यापारी संकुले बांधण्यास सुरूवात केली आहे. अशी दुकाने भाड्याने दिली जातात. त्यापोटी डिपॉझिट म्हणून मिळणार्‍या आणि भाड्यापोटी अदा केला जाणार्‍या भरभक्कम रकमा हा नवा धंदाच मंदिरांच्या ट्रस्टींच्या मागे लागला आहे.कोणत्याही देवस्थानच्या ठिकाणी हजारो भाविक येणार म्हटल्यावर त्यांच्या उतरण्याच्या आणि जेवणाच्या सोयी करणेही आलेच. त्या करताना जागा, इमारती, त्यांची देखभाल, त्यांची भाडी असाही एक नवा पसारा वाढला आहे. यातूनच कल्पना लढवत काही देवस्थानांनी मंगल कार्यालये काढली आहेत. कारण जागा तर पूर्वापार आहेतच, त्याला आता पैशाचीही जोड मिळाली आहे. काही लोक तुळजापूर, शिंगणापूर अशा धार्मिक स्थळांवर जाऊन विवाह करणे पसंत करतात. त्यांच्यासाठी आता ही नवी मंगल कार्यालये उपलब्ध होत आहेत. त्यामुळे धार्मिक स्थळी विवाह करणार्‍यांची संख्या वाढत असून परिणामी या मंगल कार्यालयांचे बुकींग सतत फुल्ल असते. त्यामुळे मंदिरांच्या व्यवस्थापनांना या कार्यालयांच्या व्यवस्थापनाची जबाबदारी सांभाळावी लागत आहेत.याच्याही पुढे जाऊन काही देवस
थानांनी मिळणार्‍या अमाप रकमेतून शाळा काढल्या आहेत. त्या छान चालल्या की मग मेडिकल किंवा इंजिनियरिंग कॉलेजही काढणे सोपेच जाते कारण पैसा अमाप आहे. या पार्श्वभूमीवर विविध देवस्थानांमध्ये दररोज जमा होणारा पैसा किती आहे याचा नेमका आकडा कोणी सांगू शकलेला नाही पण लोक मोठ्या मनाने आणि आपल्याला पुण्य लागावे म्हणून देवांसमोर हजारो रुपये टाकू लागले आहेत. एकंदरीत प्रत्येक देवस्थान एक प्रभावी शक्ती केंद्र बनू लागले आहे. देव तर राहिला देवालयात पण त्याच्या निमित्ताने एवढ्या आर्थिक आणि सामाजिक उलाढाली होत आहेत याची त्या देवाला अजिबात कल्पना नाही. आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे विशिष्ट कालावधीत अनेक देवस्थानच्या यात्रा पार पडतात. त्या काळात भाविकांची प्रचंड गर्दी लोटत असल्याने पैशांची प्रचंड उलाढाल होत असते.या शिवाय विविध देवस्थानांमध्य उद्भवणारे वाद हा सुध्दा चिंतेचा विषय आहे. या संदर्भात एक उदाहरण पुरेसे आहे. अक्कलकोट देवस्थानच्या (स्वामी समर्थ) मंदिराचे व्याप तर गेल्या 25 वर्षात फारच वाढले आहेत. या मंदिराची नोंदणी धार्मिक न्यास कायद्याखाली झाली आहे पण या व्यापातल्या काही कर्मचाऱ्यांचे वाद झाले आणि प्रकरण कामगार आयुक्तांपर्यंत गेले. त्यांनी या मंदिराला त्याचे सारे व्यापारी उपक्रम दुकाने आणि आस्थापना कायद्याखाली नोंदवावेत असा आदेश दिला. कारण ते उपक्रम मंदिराचे आहेत म्हणून धार्मिक न्यासासाठीचे नियम लागू करता येणार नाहीत असे आयुक्तांचे म्हणणे होते. आयुक्तांच्या या आदेशाला देवस्थानने उच्च न्यायालयात आव्हान दिले. त्यावर न्यायालयाने आयुक्तांचा आदेश रद्द केला पण त्यांनी देवस्थानचे म्हणणे ऐकून घ्यावे आणि नंतरच योग्य ती कारवाई करावी असाही आदेश दिला. केवळ अक्कलकोटच नव्हे तर अन्यही देवस्थानांच्या अशा व्यापारी उलाढालींची चौ
शी करावी असेही न्यायालयाने फर्मावले आहे. यातून संबंधित देवस्थाने काय धडा घेतात हे आता पहायचे.या निमित्ताने आणखी एक मोठा विषय समोर आला आहे कारण विविध देवस्थानांमध्ये करोडो रुपये जमा होत असतात. वास्तविक हा पैसा समाजाचा आहे. असे असताना तो काही मुठभर पुजारी आणि मोजकेच विश्वस्त मिळून मनमानीपणाने खर्च करत असतील, त्या पैशातून व्यापार करत असतील तर तो या पैशाचा दुरुपयोग ठरणार आहे. खरे तर हा पैसा धार्मिक कार्यावरच खर्च झाला पाहिजे. त्यातून हिंदू धर्माचा प्रचार

आणि प्रसार करण्याचे काम झाले पाहिजे. भाविकांना विविध धार्मिक प्रकाशने

स्वस्तात उपलब्ध व्हावीत यासाठी त्यातला काही पैसा खर्चला गेला पाहिजे. हिंदू धर्मातील काही आदिवासी गरिबीमुळे धर्मांतर करत असतील तर त्यांना त्यापासून परावृत्त करण्यासाठी, त्यांच्या उदरनिर्वाहाच्या सोयीसाठी या पैशांचा वापर झाला पाहिजे. आजही अनेक मंदिरांना पुजारी नाहीत. पंढरपूरसारख्या देवस्थानात लाखो लोक येतात पण त्यांच्या स्वच्छतेच्या पुरेशा सोयी उपलब्ध होत नाहीत. दर्शन मंडपाची सोय नसल्यामुळे वारकरी दहा-दहा किलोमीटर लांबपर्यंत ऊन, वारा, पाऊस या कशाची पर्वा न करता अक्षरश: उघड्या रांगेत उभे असतात. त्यांच्या सोयीसाठी असा पैसा खर्च व्हायला हवा आहे. पण बहुतांश देवस्थानच्या विश्वस्तांमध्ये ही सामाजिक जाणीव वाढत नसल्याचे दिसते. त्यामुळे या पुढील काळात अशी जाणीव वाढीस लावून देवस्थानकडे येणारा अमाप पैसा सत्कारणी लावण्याची काही तरी सोय होणे जरुरीचे आहे. तरच या पैशातून होणारे व्यापारीकरण थांबेल आणि भाविकांना खर्‍या अर्थाने मानसिक शांती आणि समाधान लाभेल.

(अद्वैत फीचर्स)

— अभय देशपांडे

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..