डोंगरदर्यामधून वस्ती करणारा, आधुनिक, नागरी-शहरी संस्कृतीपासून दूर राहून निसर्गाच्या कुशीत रमणारा आदिवासी समाज. निसर्ग हीच त्याची देवता. पिढयानंपिढया शिक्षणाचा गंधही नाही पण जीव समृध्दीसाठी आणि संरक्षणासाठी उपयुक्त ठरणार्या अनेक नैसर्गिक घटकांची माहिती या आदिवासी बांधवांना आहे. या रानात वनात राहणार्या आदिवासींच्या वारली चित्रकलेने अगदी देश विदेशातही यशस्वी मोहोर उमटविली आहे. याच वारली चित्रकलेचा पंरपरेने आलेला वारसा जपत आहे ठाणे जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील रायतळी येथील वारली हस्तकला पुरुष बचत गट.
रायतळी डहाणूपासुन ९ कि.मी.अंतरावरील आदिवासी पाडा. यातील ७ कि.मी. अंतर डांबरी रस्त्याने जोडलेले . उर्वरीत २ कि.मी. अंतर पायीच पार पाडण्याशिवाय पर्याय नाही. या पाडयापर्यंत बस अथवा एस.टी. जात नाही. ३ हजारांच्या आसपास लोकसंख्या असणार्या या गावात रस्त्यांची अवस्था या गावातील मिळवत्या पुरुषांचे शिक्षण फार नाही. तरीही परंपरेने चालत आलेल्या या वारली चित्रकलेचा, हस्तेकलेचा झेंडा त्यांनी देश विदेशातही फडकवला आहे.
रायतळी येथील चिंतू गडका राजड यांच्या अध्यक्षतेखाली आणि नथू देऊ सुतार यांची सचिवपदी निवड होऊन १२ मार्च २००४ रोजी वारली हस्तकला पुरुष बचत गटाची स्थापना झाली. या गटातील सर्व सदस्य आदिवासी समाजातील आहेत. सगळीच मंडळी ३ री ते ४ थी पर्यंत शिकलेली. शेतात नवं पीक आलं की परंपरागत पध्दतीने घराची रंगगंगोटी व्हायची .दिवाळी सणाच्या वेळी ,लग्नाच्यावेळी चौक काढले जायचे. हिमाई देवीही वारली समाजाची कुलदेवता. सर्वात आधि तिची पुजा केली जाते. मगच दुसर्या दिवशी लग्नाचे बाशिंग बांधले जाते. या सर्व प्रसंगी चित्रे काढून घरेदारे सजविली जातात. ही प्रथा अगदी पुर्वापार चालत आली आहे. पुर्वापार चालत आलेली ही प्रथा केवळ घरापुरती मर्यादित होती. तिला हळूहळू बाजारपेठ उपलब्ध होऊ लागली आहे. रायतळी येथे बचतगट स्थापना होण्यापूर्वीही केंद्र
शासनाच्या वस्त्रोद्योग मंत्रालयाच्या हस्तकला
विकास आयोगाकडून येथील कलावंतांना प्रोत्साहन देण्यात आले आहे. बचतगट स्थापना होण्यापूर्वी या विभागातर्फे रयतळी येथील आदिवासी बांधवांना मुंबई, पुणे, दिल्ली, जयपूर, भोपाळ, गोवा ,चंदीगड, तिरुपती, कलकत्ता,आग्रा, मद्रास,म्हैसूर, बेंगलोर आदी सर्व मोठया शहरामध्ये वारली चित्रकलेचे प्रदर्शन लावले असन त्यांना मोठया प्रमाणात प्रतिसादही मिळाला आहे. बचत गटातील सदस्य नाथू् देऊ सुतार याना १९८३ च्या सुमारास जर्मनीला व त्यानंतर १९८८-८९ मध्ये इंग्लंडमध्ये भरलेल्या प्रदर्शनातही वारली चित्रकलेचे प्रदशन्व मांडले होते. त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला होता.
प्रदशन्व-ाासाठी वेळोवळी राज्य परराज्याच्या ठिकाणी जायला पैशांची आवश्यकता होती. त्यामुळे वारली पेटिंग करणारे ८-१० जणांनी एकत्र येऊन महिन्याला १०० रु. सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या गंजाड शाखेत जमा करु लागले . बँकेच्या अधिकार्यांना त्याना बचतगटाबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले आणि सुरु झाला १२ मार्च २००८ रोजी वारली हस्तकला पुरुष बचत गट. ग्रिटींग, टी शर्ट, पेटिग्ज, सिल्क साडीवरील पेटिग, बेडशिट, उशी कव्हरवरील पेटिंगला खुप मोठया प्रमाणात मागणी असते. पेटिंग तयार करताना मांजरपाट कापडावर फेबिकॉल, लालमाती एकत्र करुन कापड रंगवन घेतले जाते. नैसर्गिक रंगामध्ये शेण, बांबुच्या काडया , तांदळाचे पीठ किंवा फॉब्रिक कलर यांचा वापर केला जातो. १X१ फुटाचे पेटिंग १०० रु विकले जाते. याच पटीने मोठया पेटिंगच्या किंमती वाढतात. एक टि शर्ट रु. २०० ते २५० रु. डबल बेंडशिट १००० रु तर सिल्क साडीवरील पेटिंग १५०० रु. पासन पुढे तयार करण्यात येते. एका साडीवर पेटिंग करायला दो-न व्यक्तींना एक दिवसाचा वेळ लागतो. वर्षाला साधारणत: ३ ते ४ लाखांचा व्यवसाय होतो. या गटातील सदस्यांचा मुख्य व्यवसाय शेती असन शेती करुन उरलेल्या वेळात ते ६-७ महिन्यात वारली पेटिंग करतात. आतापर्यत बॅंकेने त्यांना १ लाख ६० हजार रुपयाचे कर्ज दिले असन त्यात ८० हजार रुपयांचे अनुदान दिले आहे. उर्वरित कर्जाचे सर्व हप्ते फिटले आहेत. या बाबत गटान आतापर्यत बांद्रा, दिल्ली, गोवा, हैद्राबाद, पूणे आदि ठिकाणाच्या सरस प्रदर्शनांमधन वारली चित्रकलेचे /हस्तकलेचे प्रदर्शन केले आहे.
— बातमीदार
Leave a Reply