नवीन लेखन...

वारी..

निघाल्या संतांच्या पालख्या विठुरायाच्या भेटीला, मोठा अजब क्षण असतो हा नाही. शेकडो वर्ष न चुकता संताची मांदियाळी शेकडो किलोमीटर अंतर पायी कापतात. एक वेगळाच उत्साह एक वेगळीच ओढ असते प्रत्येकाच्या चेहऱ्यावर. विठूनामाचा गजर करत चालणारे लाखो वारकरी, लहान नाही, मोठा नाही, स्त्री नाही, पुरुष नाही जातपात नाही. भेदाभेद तर अजिबात नाही. माऊलीनी भागवत धर्माची स्थापना करताना माणसा माणसातला भेद आणि जातीपाती पूर्णपणे इंद्रायणी मध्ये बुडवून टाकल्या. आणि खांद्यावर भगवी पताका घेऊन माऊली विठ्ठलाच्या भेटीला निघाले. आणि त्यांच्या समवेत निघाला अख्खा महाराष्ट्र. आजहि ८००/९०० वर्षानंतर माउलींची आणि पांडुरंगाची भेट नित्यनेमाने दर वर्षी होते आणि त्याचे साक्षीदार असतात अनेक संत आणि माउलींची भागवत धर्माची पताका समर्थपणे पेलणारे लाखो वारकरी. एवढ अंतर चालून हि हाती ताल मृदुंग घेऊन नाचणारे वारकरी पहिले कि वाटत कुठून आणतात हे इतकी शक्ती. कुठून येत इतका बळ. वरून पडणारा पाऊस, पायाखाली चिखल तरीही तालमृदुंगावर नाचणारे वारकरी.

विठ्ठलाबद्दल संताना वाटणारी ओढ तुकोबा रायांच्या अनेक अभंगानमधून दिसून येते. विठुरायाच्या साजिर्या रूपाचे वर्णन करताना तुकोबा म्हणतात.

सुंदर ते ध्यान उभे विटेवरी| कर कटावरी ठेवूनिया ||१||
तुळसीचे हार गळा कसे पिताम्बार| आवडे निरंतर ते ची रूप ||धृ||
मकर कुंडले तळपती श्रवणी | कंठी कौस्तुभमनी विराजित||२||
तुका म्हणे माझे हेची सर्व सुख| पाहीन श्रीमुख आवडीने ||३||

तुकोबारायांचे सर्वच अभंग भक्ती रसपूर्ण आहेत. पण विठ्ठलाच्या रूपाचे वर्णन या चार ओळींमध्ये आणि इतका अर्थपूर्ण करू शकणारे तुकोबाच. नुसता अभंग वाचूनही साक्षात विठ्ठल दर्शनचा साक्षात्कार होतो. आणि का हे लाखो भाविक विठ्ठलाच्या दर्शनासाठी इतके आसुसलेले असतात याचा हि प्रत्यय येतो. या लोकांना कोणताही आमंत्रण नसता हो. कोणी यांच्या घरी जाऊन सांगत नाही कि वारीला या, किवा कोणी कसलाही पत्र व्यवहार कारण नाही. पण एरवी पत्रिकेशिवाय सध्या लग्नालाही न जाणारे हे अनेक भाविक विठ्ठल भेटीच्या ओढीने देहू आळंदीला जमतात आणि तुकोबा माउलीसंगे पंढरपूरचा रस्ता धरतात.

महाराष्ट्र हि संतांची भूमी आहे. अनेक संतानी आपल्या अभंगांनी, भारुडानी लोकांना जगण्याचे तत्वज्ञान शिकवले आहे. अवघे जगच विष्णुमय भासणार्या तुकोबांनी भागवत धर्माची महती थोडक्यात पण अतिशय सुंदर शब्दात सांगितली आहे. तुकोबा म्हणतात.

विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म| भेदाभेदभ्रम अमंगळ ||१||
अइका जी तुम्ही भक्त भागवत| कराल ते हित सत्य करा|| धृ ||
कोणा हि जीवाचा न घडो मत्सर | वर्म सर्वेश्वर पूजनाचे||२||
तुका म्हणे एका देहाचे अवयव| सुख दुख जीव भोग पावे||३||

इतक्या सहज सोप्या शब्दात अवघ्या जगण्याचा तत्वज्ञान शिकवणाऱ्या या संताच्या वारीत, या तत्वज्ञानाचा अनुभव घेण्यासाठी एकदा तरी प्रत्येकाने सामील ह्यायालाच हव. परमेश्वराला प्रत्येक माणसामाणसामध्ये बघण्याचे शिक्षण देणारे हेच तत्वज्ञान या वारीला वेगळ महत्व प्राप्त करून देत….

आपला
शैलेश देशपांडे

— शैलेश देशपांडे उर्फ श…

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..