सीकेपी कुटुंबांमध्ये अगदी नियमितपणे.. कोणत्याही खास प्रसंगी केला जाणारा प्रकार म्हणजे वालाचं बिरडं…
साहित्य:
१/२ कप कडवे वाल (मोड आल्यावर साधारणपणे १/२ कप होतील असे)
३/४ कप बारीक चिरलेला कांदा
९ ते १० मिरी दाणे (ठेचून घेतलेले)
७ ते ८ ठेचून किंवा चिरुन घेतलेल्या लसणाच्या पाकळ्या
१/२ कप खवलेलं ओलं खोबरं
१ टीस्पून लाल तिखट
१/२ टीस्पून हळद
१ टेबलस्पून किसलेला गुळ (आवडत असल्यास)
३ आमसुलं
१/२ टीस्पून चिंचेचा कोळ
मीठ चवीप्रमाणे
१ टेबलस्पून तेल
कृती:
सर्वप्रथम वाल १०-१२ तास पाण्यात भिजत घाला. भिजलेले वाल १८ ते २० तास चाळणीत उपसून एखाद्या उबदार जागी ठेवा म्हणजे त्याला लांब नोड येतील. लांब मोड आले की हे वाल गरम पाण्यात भिजवून ठेवा म्हणजे त्याची साले निघून येतील. वालाची साले काढून वाल सोलून घ्या.
नंतर एका पातेल्यात तेल गरम करावे. तेल चांगले तापले की त्यात लसूण फोडणीला गालावा. लसूण गुलाबी झाला की कांदा घालून परतून घ्यावे. यात मिरी ठेचूण घालावी. ३-४ मिनिटे कांदा परतून घ्यावा. नंतर त्यात सोललेले वाल घालावेत. दीड ते पावणे दोन कप पाणी घालूण, वरुन झाकण ठेवून साधारण २५-३० मिनिटे शिजवत ठेवावे. वाल पूर्ण शिजले की त्यात हळद, तिखट, ओलं खोबरं आणि मीठ घालून ढवळून घ्यावे व ३ ते ४ मिनिटे उकळत ठेवावे. नंतर त्यात आमसुल व थोडा गुळ घालावा. झाकण ठेवून पुन्हा शिजवत ठेवावे. अशाप्रकारे गरमागरम वालाचे बिर्डे तयार. त्यावर वरुन बारीक चिरलेली कोथिंबीर घालून चपाती अथवा वाफाळलेल्या भाताबरोबर हे बिरडे सर्व्ह करावे.
— श्रीमती गुलाब अरविंद प्रधान
Leave a Reply