नवीन लेखन...

विद्यार्थ्यांसाठी मनोगत

विद्यार्थी

मित्र-मैत्रीसाठी एक मनोगत

(हे मनोगत जरी विद्यार्यांसाठी असले तरी पालकांनी ते मुलांना -४-५ पासूनच्या – वाचून त्याचा अर्थ नीट समजावून सांगावा.)

‘मनोगत’ हा

शब्द वाचल्यावर आपणा सर्वाना वाटले असेल, की हा उपदेशाचा डोस असणार. खरं आहे; पण

हा ‘डोस’ नाही. तर सत्य परिस्थितीची जाणीव करून

देण्याचा एक प्रयत्न आहे.

निरनिराळ्या

वर्गातील मुलांना “ अभ्यास कशासाठी करता ? असं प्रश्न

विचारला; तर मुले अनेक उत्तरे देतात.” ‘स्वतःसाठी

अभ्यास करतो’ हे उत्तर बरोबर आहे. पण त्याचा खुलासा मात्र

मुलांना देता येत नाही. आणि त्यात अनपेक्षित काही नाही. आणि तो खुलासा मी देणार

आहे.

अभ्यास करायचा –

जास्तीत जास्त गुण मिळवायचे. “गुण” – म्हणजे

‘ज्ञान.’ सद्य परिस्थितीत “ ज्ञान

मिळवून मोठे होण्याचा तो एक प्रचलित मार्ग आहे. पण अभ्यास

करताना फक्त “पास” होणे; असा विचार

घातक आहे. लौकिक अर्थाने ९०-९५ % गुण मिळविणारा विद्यार्थी हुशार समजला जातो. आणि

ते खरे आहे. पण याचाच अर्थ तो १०-५ % अज्ञान घेऊन उत्तीर्ण झाला आहे.- तर त्यात

काय चूक आहे ? १०० % गुण मिळविणे जवळजवळ अशक्य आहे. मान्य. पण जास्तीत जास्त गुण

मिळविण्याचा प्रयत्न तुम्ही करता का ? स्वतःच्या मनालाच विचारा.

तो प्रयत्न सर्वसाधारणपणे कमी पडतो, हे नक्की. दरवर्षी

वार्षिक परीक्षेतील टक्केवारी; अपवाद सोडता कमी होत असते. पुस्तकातील ज्ञान

समजावून घेण्याचा प्रयत्न कितीजण करतात ? पुस्तकात काही ठिकाणी “ हे

आपण मागे पाहिलेच आहे ” असे लिहिलेले असते. म्हणजेच आधीचे सर्व

समजले आहे असे समजून पुढील वर्षीचे पुस्तक तयार करतात. म्हणजे १०० % गुण जरी नाही

मिळाले तरी सर्व ज्ञान समजावून घेणे आवश्यक आहे. न समजलेला भाग समजावून घेण्यासाठी

कितीजण शिक्षकाना शंका/प्रश्न विचारतात ? कारण “लाज” वाटते.

का ? बरे, तो भाग खाजगी

क्लासमध्ये जाणारे तरी पूर्णपणे समजावून घेण्याचा प्रयत्न

करतात का ? अभ्यासक्रम पूर्णपणे समजून घेणे आवश्यक

आहे. हे सर्वांनी लक्षात ठेवणे अत्यावश्यक आहे. ५ वी पासूनच

ही गोष्ट गंभीरपणे घ्यावी. तसे न करणे आणि फक्त पास होणे म्हणजे ज्ञानाचा पाया

कच्चा ठेवणे. आणि आपल्या ज्ञानाची इमारत कच्च्या पायावर उभी करणे. कच्च्या

पायावरची इमारत धोकादायक असते. लहान आहोत, नंतर करू ही वृत्ती अतिशय धोकादायक आहे.

स्वतःला तहान लागली तर स्वतः पाणी पिण्यानंतर तहान भागते. तसेच स्वतः अभ्यास केला

तरच तुम्हाला ज्ञान मिळेल.

हा अभ्यास करून

काय होणार ? त्यातून तुमचे भविष्य घडणार आहे. मोठे झाल्यावर नोकरी, व्यवसाय काहीही

करा. तुम्ही भविष्यात रस्त्यावर पायी चालणार, सायकलवर हिंडणार, दुचाकी/चारचाकी

वाहनातून हिंडणार, की विमानाने हिंडणार हे ठरणार आहे. आज पालक तुमच्यासाठी कष्ट

करतात, पैसे खर्च करीत असतात – तुम्ही चांगला अभ्यास करावा म्हणून.

त्याच्या मोबदल्यात तुम्ही त्यांना काय देणार ? तुमच्या यशाचा आनंद द्या. हे सर्व

करणे त्यांचे कर्तव्य आहे, असेही म्हणणारे आहेत. मग तुमचे काय कर्तव्य आहे; ह्याचा

पण विचार करा. घरी १० पिढ्या पुरेल एवढा पैसा आहे, पण तो राखला नाही तर ४ त्या

पिढीला पण पुरात नाही असे इतिहासात दिसते. घरचा व्यवसाय आहे तो सांभाळण्यासाठी पण

ज्ञानाची आवश्यकता आहे. एकाच व्यवसाय १० पास होऊन चालविणे, बी. कॉम. होऊन चालविणे,

बी.कॉम.,एल.एल. बी. होऊन चालविणे, बी.कॉम.,एल.एल.बी.,एम.बी.ए. होऊन चालविणे ह्यात

खूप फरक आहे. स्पर्धा युगात काहीही घडू शकेल. नंतर पश्चाताप होऊन उपयोग

नाही.तुमच्या आई-वडिलांचे वैभव हे त्यांचे आहे. ते तुमच्यावर करीत असलेला खर्च हे

जरी त्यांचे कर्तव्य असले तरी तुमचेही काहीतरी कर्तव्य आहे हे विसरू नका.

५ वी पासूनच्या

सर्व विद्यार्थ्यांनी आजपासूनच हा विचार करावा.

विस्तवास हात लावला की तो भाजतो हे निसर्ग

सत्य आहे. अभ्यास करणे न करणे याचे असेच आहे.

बघा,

माझे म्हणणे पटत असेल तर जोरात अभ्यासास सुरुवात करा. यशस्वी व्हा.

शुभेच्छा.

स. रा.भावे, २ शुक्लेंदू, ५६ टि. म. वि. कॉलोनी, गुलटेकडी,

पुणे ४११ ०३७.

फोन नंबर : ०२०-२४२६ ४२७७.

— श्री.सदानंद रामचंद्र भावे

1 Comment on विद्यार्थ्यांसाठी मनोगत

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..