एकदा एका कार्यक्रमाला गेलो
गंमत म्हणुन कवीता ऎकायला लागलो
एका विद्रोही कवीच्या कवीता मनी रुतल्या
डोळ्यांच्या कडा परतपरत ओल्या झाल्या
किती त्याची पुस्तक विकत आणली
बघता बघता अनेक वेळा वाचुन झाली
प्रत्येक कवीता वाचताना डोळे भरुन आले
गरिबांच दुःख वाचताच गलबलुन आले
अशीच कधीतरी गाठभेट झाली
फ़ावल्या वेळी चांगली चर्चाही झाली
कधी तो माझ्या घरी कधी मी त्याच्या घरी
बघता बघता आमची मैत्रीही झाली
एकदा अचानक त्याच्या घरी गेलो
आतल दृष्य पाहुन मात्र सर्दच झालो
हास्य विनोदात रंगलेली
दारु चिकनची पार्टि होती
मित्राला म्हणालो लेका विद्रोही कवी
तुला हासायला परवानगी कोणी दिली
हासत हासत म्हणतो कवी
विद्रोही कवीतांची आहे मोठी चलती
त्यानी माझी ओळख करुन दिली
हे आपले प्रकाशक व हे आपले मंत्री
यंदा गावोगावी काव्यगायन करीन
यंदाच इलेक्शन गाजऊन टाकीन
त्यांचीच गरिबी त्यांनाच ऎकवीन
इलेक्शन जिंकवुन शिरमंत होईन
रंगरंगोटी करुन घर झाकझुक करीन
गडी माणसाकडुन आंगण सारवुन घेईन
शेजारचा उपाशी नाम्या सकाळी रडतो
दिवाळीची मजा भडवा खराब करतो
यंदाची दिवाळी गोव्यात करीन
दारु पिता पिता कवीता करीन
तडक उठुन मी घरी आलो
पुस्तकांच्या ढीगावर रॉकेल ओतु लागलो
आग पेटताच वेड्यासारखा हासलो
राखेकडे बघुन मात्र हमसाहुमशी रडलो
— अजिंक्य प्रधान
Leave a Reply