नवीन लेखन...

विश्वविजयी संन्यासी

 

(त्या व्याख्यानाच्या दिवशी स्वामीजी व्यासपीठावर आले आणि त्यांनी आत्मविश्वासपूर्ण बोललेल्या माय ब्रदर्स अँड सिस्टर्स इन अमेरिका या पहिल्याच वाक्याने संपूर्ण सभागृहातील लोकांना भारावून टाकले.)

1981 साली एम. आय. टी. कॉलेजने स्वामी विवेकानंदाच्या जयंती दिनानिमित्त युवकांची जागरण फेरी काढली होती. हजारो तरुण त्यामध्ये सहभागी झाले होते. त्या मिरवणूकीमध्ये मी स्वामी विवेकानंदांच्या वेषभूषेत शोभारथावर उभा होतो. त्यावेळी त्यांची वाक्ये बोलताना मला जाणवले की या थोरा-मोठ्यांच्या वेषभूषेची नक्कल करण्यापेक्षा त्याच्या मागचे त्यांचे सखोल विचार अभ्यासणे आवश्यक आहे आणि मी स्वामी विवेकानंदांचे चरित्र अभ्यासायला सुरुवात केली. मध्यंतरीच्या काळामध्ये छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांची भूमिका करण्याचा प्रसंग आला त्यावेळी त्यांचेहि चरित्र असेच अभ्यासण्याची संधी मिळाली आणि अशा महापुरुषांच्या चरित्र अभ्यासण्यासाठी प्रेरणा मिळाली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे द्वितीय सरसंघचालक माधव सदशिव गोळवलकर तथा श्रीगुरुजी यांच्या जन्मशताब्दी वर्षामध्ये 2006 साली गुरुजींच्या जीवनातील प्रसंगांवर आधारित त्रिवेणी संगम नावाचा कार्यक्रम केला.

भारतीय समाज हा अतिशय तन्मयतेने कथा ऐकतो मग त्या पुराण काळातील असो किंवा कीर्तनातील असो. त्यामुळे अशा काही प्रसंगांवर कथारुप व्याख्यानेही केली.

2007 साली ब्लॅक-व्हाईट या कार्यक्रमासाठी शिकोगो, अमेरिकेला जाण्याचा प्रसंग आला. त्यावेळी मी ज्याठिकाणी स्वामी विवेकानंदांनी ते जगप्रसिद्ध व्याख्यान दिले त्या कोलंबस सभागृहाला भेट देण्यासाठी गेलो होतो. साधारण 800-900 लोक बसतील एवढ्या आकाराचा तो हॉल आहे. बाजूलाही छोटे सभागृह आहे. पण त्या काळाच्या मानाने तो हॉल पुरेसा असेल असे वाटते. त्या हॉलच्या दर्शनी भागाला ताम्रपट असून स्वामीजींचा तो प्रसंग त्यावर शब्दबद्ध केला आहे.

त्या जगप्रसिद्ध व्याख्यान मालेतील ज्या व्याख्यानामुळे स्वामीजींना अमेरिकन लोकांनी डोक्यावर घेतले त्या व्याख्यानापूर्वी 3-4 दिवस आधीपासूनरोज स्वामीजींचे नाव पुकारले जात होते. परंतू स्वामीजी ते टाळत असत. शेवटी त्या व्याख्यानाच्या दिवशी स्वामीजी व्यासपीठावर आले आणि त्यांनी आत्मविश्वासपूर्ण बोललेल्या माय ब्रदर्स अँड सिस्टर्स इन अमेरिका या पहिल्याच वाक्याने संपूर्ण सभागृहातील लोकांना भारावून टाकले. पुढील सात दिवस त्या सभागृहामध्ये सर्वधर्मीय प्रतिनिधींची चर्चा आणि व्याख्याने स्वामीजींनी मन लावून ऐकली. 19 सप्टेंबर 1883 साली स्वामीजींची पत्रकार परिषद झाली आणि त्यानंतर अमेरिकन प्रसारमाध्यमांनी स्वामीजींना डोक्यावरच घेतले.

(जागतिक धर्मपरिषदेपूर्वी अमेरिकेत एक औद्योगिक प्रदर्शन भरले होते. या परिषदेस मिकोलाईट टेक्सला नावाचा एक फ्रेंच शास्त्रज्ञ रोज जात होता. तेव्हा तेथे एक भगवी कफनी घातलेला माणूस रोज यायचा आणि त्या प्रदर्शनातील यंत्रे मानवी हितासाठीच वापरली जातील का? त्यातून नक्की मानवी श्रम कमी होतील ना? असे प्रश्न विचारत असे. ही व्यक्ती म्हणजे दुसरे तिसरे कोणी नसून स्वामी विवेकानंद होते.)

(स्वामीजी एका ग्रंथालयातून विश्वकोशाचे मोठ-मोठे खंड रोज घेऊन जात व दुसर्‍या दिवशी परत आणून देत. हे पाहिल्यावर तेथील ग्रंथपालास वाटले की ते आजुबाजूच्या लोकांवर छाप पाडण्यासाठी ती पुस्तके नेत असावेत. एक दिवस त्यांनी तसे स्पष्ट स्वामीजींना विचारले तेव्हा स्वामीजींनी हसून उत्तर दिले आपल्यामध्ये एकाग्रता असेल तर ही पुस्तके वाचायला एक दिवसच काय तर काही तासच पुरेसे आहेत. तरीही त्या ग्रंथपालांचा विश्वास बसला नाही आणि त्यांनी स्वामीजींना त्या पुस्तकांवर आधारित काही प्रश्न विचारले तेव्हा स्वामीजींनी सर्व प्रश्नांची अचूक उत्तरे तर दिलीच परंतू कित्येकदा परिच्छेदाच्या परिच्छेद तोंडपाठ सांगितले हे पाहून ते ग्रंथपाल आवाक् झाले.)

स्वामी विवेकानंद म्हणायचे की माणसे सोडून अन्यांना महत्व आले आहे. हे सांगताना ते गोष्ट सांगत की रस्त्यावर बसून देवाचे चित्र काढणारा गरीब चित्रकार गरीबच राहिला आणि देव श्रीमंत झाला कारण लोक देवावरच पैसे फेकत होते.

आज आपण निरनिराळ्या देवस्थानांची प्रसारमाध्यमातून जाहिर होणारी संपत्ती आपण बघतो आणि स्वामीजींचे द्रष्टेपण जाणवते. आज देवस्थानांकडे अमाप संपत्ती आहे पण त्याच मंदिराबाहेर गरीब भिकारी बसलेलेही दिसतात.

मी भारतामध्ये देत असलेल्या व्याख्यानांची माहिती माझ्या परदेशस्थ मित्रांनाही होती. त्यांनी मला तेथे व्याख्यानासाठी येण्याचा आग्रह केला त्याप्रमाणे नुकताच मी मार्च-मे असे साधारण अडीच महिने इंग्लंड अमेरिकेला जाऊन आलो. तेथे विविध विषयांवर व्याख्याने दिली. अमेरिकेतील शिकागो, बाल्टिगो, बफेलो, फिनिक्स आदी शहरांवर व्याख्याने दिली. त्यामध्ये स्वामी विवेकानंदांवरसुद्धा व्याख्याने देण्याचा योग आला. त्यानंतर तेथील तरुणांच्या शंकांचे निरसनही केले जायचे.

आजही भारतामध्ये आपल्याला स्वामीजींचे विचार तळगाळामध्ये पोहचवताना लहान मुलांना स्वामीजींची कथारुपाने, तरुणांना स्वामीजींचा ध्येयवाद, तर प्रौढांना स्वामीजींचे तत्वज्ञान अशा प्रकारे कार्य केले पाहिजे.

राहुल सोलापूरकर, पुणे

शब्दांकन – मुकुंद कानडे

(सौजन्य – “पंढरी प्रहार”)

— राहुल सोलापूरकर

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..