अरे आमच्या लेकरा लेकरा !
का रे धाडतो आम्हा वृध्दाश्रमा !!१!!
काय गुन्हा रे आम्हीच केला !
नऊ मास नऊ दिस गर्भ वाढविला !!२!!
शिक्षण देऊनी तुज ज्ञानी केले !
असे कसे ते पांग फेडिले !!३!!
उपाशी पोटी तुला भरविले !
एका वस्त्रावरी दिस काढले !!४!!
आदर्श तो कां नाही ठेवायचा !
श्रावण बाळाच्या त्या सेवेचा !!५!!
भक्त पुंडलिक माय-पिता सेवेसाठी !
उभे ठेविले पांडुरंगा विटेवरी जगजेठी !!६!!
एकच आशा उरते मनात !
मन रमवावे ते नातवंडात !!७!!
यासाठी पदर पसरिते, तुला विनविते !
नको तोडू रे मायेला, नातवंडांना आम्हाते !!८!!
अरे, आमच्या लेकरा लेकरा !
कां रे धाडतो आम्हां वृध्दाश्रमा !!९!!
— उर्मिला प्र. भुतकर
ठाणे भूषण
Leave a Reply