वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरात एकच सामाईक प्रवेश परीक्षा (सीईटी) होणार आहे.
ग्रामीण भारतातील विद्यार्थ्यांना जाणून बुजून स्पर्धेतून बाद करण्या साठी INDIA च्या नोकरशाही आणि राजकारण्यांनी हि खेळी रचली आहे. . आज ग्रामीण भागात शैक्षणिक सुविधांची बोंबाबोंब आहे. बऱ्याच खेड्यात शाळात गुरुजी नाहीत, शैक्षणिक साधने नाहीत . उलट शहरी भागात शाळांपासून खाजगी शिकवणीचे गलोगल्ली कारखाने आहेत,बालवाडी पासूनच खाजगी शिकवण्या लावल्या जातात. त्यात CBSE च्या विध्यार्थ्यांना पडणारे भरमसाठ गुण. या गुणांमुळे खुद्द महाराष्ट्रातातील नव्हे तर भारतातील नावाजलेल्या शैक्षणिक सुविधा असलेल्या मुंबई शहरातील दहावीच्या विद्यार्थ्यांची गेल्या ३ वर्षा पासून ससेहोलपट चालू आहे. प्रत्येक वर्षी कोर्टात प्रकरण गेल्या शिवाय प्रवेश होत नाही . आज आगस्ट संपत आला तरी प्रवेश झाले नाही. हा सर्व वाईट अनुभव असूनही सर्व भारतभर एकच सीएटी घेण्याचा अट्टाहास का? राज्यापुरता विचार केल्यास सामाईक परीक्षेत “एनसीईआरटी’ने निर्धारित केलेल्या अभ्यासक्रमांतून प्रश्न विचारले जाणार आहेत. मात्र राज्य प्रशिक्षण मंडळाच्या अभ्यासक्रमात त्या मानाने मोठी तफावत आहे. त्यातून राज्यातील “सीबीएसई’चे विद्यार्थी वगळता उर्वरित विद्यार्थ्यांना किमान 20 टक्के गुण कमी मिळण्याची शक्यता आहे. तसेच हा निर्णय आता जाहीर झाला असल्याने बारावीतील विद्यार्थ्यांची मानसिकता विचलित होऊ शकते. राज्याराज्यात घेतल्या जाणाऱ्या प्रवेश परीक्षा त्या त्या राज्याच्या अभ्यासक्रमावर आधारित असतात तर ही देशभर घेण्यात येणारी परीक्षा CBSC च्या अभ्यासक्रमावर आधारित असेल . यामुळे ग्रामीणभागातीलच नव्हे तर सरकारी शाळातून शिकणारी , बहुसंख्य मुले यास्पधेतून बाद होतील . केवळ कांही %(टक्के) विद्यार्थ्यांना अनेक परीक्षा द्याव्या लागतात म्हणून बाकी बहूसंख्य विद्यार्थ्यांना वेठीस धरणे चूक आहे.
शहरात असलेल्या शैक्षणिक सोयी
जो पर्यंत खेडे गावी पोहचत नाही तो पर्यंत अशी परीक्षा घेणेच चूक आहे. ग्रामीण
शिक्षण तज्ञांनी आताच या विरुद्ध आवाज उठवून हाय कोर्टात जनहित याचिका दाखल करावी उशीर झाला तर ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. शहरात शिकणाऱ्या ग्रामीण विद्यार्थ्यांनी या विरुद्ध आवाज उठवावा. शहरी संघटना कांही करणार नाही. त्यांचा फायदा आहे. कृपया आपल्या प्रतिक्रिया आवश्य कळवाव्यात ही विनंती.
— ठणठणपाळ परभणीकर
Leave a Reply