८ सप्टेंबर १९४४ रोजी पश्चिम ऑस्ट्रेलियातील पर्थमध्ये टेरेन्स जेम्स जेन्नरचा जन्म झाला. क्रिकेटपटू म्हणून फारसे यश त्याला मिळाले नाही. १९७०-७१ च्या हंगामातील सिडनी कसोटीत इंग्लंडच्या एका वेगवान गोलंदाजाचा चेंडू – जॉन स्नोचा चेंडू – जेन्नरला जायबंदी करून गेला होता. कसोटीनिवृत्तीनंतर जेन्नरच्या हातून एक महान कामगिरी घडली. शेन वॉर्न हा उपजत प्रतिभावंत आहेच पण त्याची ही प्रतिभा वेळीच ओळखून तिला पैलू पाडण्याचे काम टेरी जेन्नरने केले.
८ सप्टेंबर २००१ रोजी आजवरच्या कसोटी सामन्यांमधील सर्वात ‘लहान’ फलंदाजाने काढलेली शंभरी आली. हा मानकरी होता बांग्लादेशचा मोहम्मद अश्रफउल. विशेष म्हणजे अश्रफउलचा हा पदार्पणाचा सामना होता. पहिल्या डावात त्याने २६ धावा केल्या होत्या. दुसर्या डाव सुरू करताना बंगबंधू ४६५ धावांनी पिछाडीवर होते. अश्रफउलने दुसर्या डावात ११४ धावा काढल्या. अश्रफउलच्या दोन जन्मतारखा सांगितल्या जातात पण कोणत्याही तारखेने तो मुश्ताक मोहम्मदच्या १७ वर्षे ८२ दिवस या वयापेक्षा सरसच ठरतो. १९६०-६१ च्या हंगामात पाकिस्तानच्या मुश्ताक मोहम्मदने भारताविरुद्ध शतक केले होते. सुमारे ४० वर्षे मुश्ताकचा विक्रम टिकला. हा सामना मात्र बांग्लादेशने गमावला. बांग्लादेश ९० आणि ३२८. श्रीलंका ५५५.
— डॉ. आनंद बोबडे
Leave a Reply