रस्त्याच्या कडेला पानाच्या टपरीवर उभी राहून एखादी तरूणी सिगारेट ओढत असेल तर तिच्याकडे पाहताना काही पुरूषही स्तब्ध होतात. मी जेंव्हा सुरूवातीला हे असं दृष्य पाहिलं तेंव्हा मला वाटल होत,’ मला दिसलेलं हे दृष्य अपवादात्मक असावं. पण नंतर ते दृष्य मला सतत दिसू लागल आणि त्यानंतर मला त्या बद्दल फारसं आश्चर्य वाटण बंद झाल. म्हणजे माझ्यासाठी आता ते दृष्य नित्याच झाल. आपल्या देशातील स्त्रियांनी खरोखरच सर्वच बाबतीत पुरूषांची बरोबरी साध्य केलेली आहे अगदी व्यसनांच्या आणि व्यसनाधिनतेच्या बाबतीतही अस म्ह्णायला आता वाव आहे. आपल्या देशातील पुरूष आणि व्यसनाधिनतेचा खूपच जवळ्चा संबंध आहे. आज ही रस्त्यात पुरूषासांरखी दारू पिऊन पडलेली बाई दिसत नाही याचा अर्थ आजूनही या बाबतीत स्त्रिया पुरूषांच्या मागे आहेत हे नशिबच म्ह्णावं लागेल. पुर्वी पुरूषांच्या तुलनेत स्त्रियांच आयुष्यमान अधिक होत त्याला त्यांच निर्व्यसनी असणं हे ही एक कारण असावं पण आता व्यसनाधिन स्त्रियांच प्रमाण समाजात झ्पाट्याने वाढू लागल्यामुळे भविष्यात आपल्या देशात स्त्रियांच्या आरोग्या बाबतच्या समस्यांत भर पडण्याची शक्यता नाकारता येणार नाही.
शहरी भागातील आणि ग्रामिण भागातील स्त्रियांची व्यसने वेगवेगळी असली तरी स्त्रियांची व्यसनाधिनता दोन्हीकडे सारखीच आहे. आजही आपल्या देशातील गावकडील स्त्रिया तंबाकूच्या मशेरीने दात घासतात त्यांना हे व्यसन वाटत नसल तरी ते एक व्यसनच आहे, पान-सुपारी तंबाकू आणि त्यापासून तयार केलेले पदार्थांच त्या सर्रास सेवन करतानाही दिसतात. मुंबईसारख्या शहरातील स्त्रियां पुरूषांची मक्तेदारी असणार्या जवळ-जवळ सर्वच व्यसनांच्या आहारी गेलेल्या आहेत. जगासमोर आपण सुसंस्कृत आणि सभ्य असण्याचा आव आणणार्या कितीतरी स्त्रियां जगाच्या नकळ्त दारूच्या नशेत डुंबलेल्या असतात. सर्वच बाबतीत पुरूषांची बरोबरी करण्याच्या नादात काही अविचारी तरूणी व्यसनांच्या बाबतीतही पुरूषांची बरोबरी करू पाहतात आणि व्यसनांच्या इतक्या आहरी जातात की आपलं आयुष्य बरबाद करून घेतात. अगदी मध्यमवर्गीय सुसंस्कृत घरातील मुलीही आपल्या पालकांच्या नकळ्त बिअर पिताना दिसतात तेंव्हा कपाळालाला हात लावावासा वाटतो.
माणसाच्या हातात अवाजवी पैसा येऊ लागला की तो मित्रांच्या संगतीने व्यसनांच्या आहारी जातो, मानसिक ताण कमी करण्यासाठीही माणूस कधी – कधी व्यसनांना जवळ करतो, प्रेमभंग वगैरे झाल्यावरही माणूस व्यसनी होतो, हया पैकी एकही करण माणूस व्यसनाधीन होण्यास ठोस कारण नाही. त्यामुळे पुरूषांच्या आणि पर्यायाने स्त्रियांच्याही व्यसनाधिनतेच समर्थतन करता येणार नाही. स्त्रियांच्या वाढत्या व्यसनाधिनतेचे परिणाम देशातील भावी पिढीवर होणार हे तर स्पष्टच आहे. घरातील एक स्त्री सुशिक्षित झाली तर ती अवघ कुटूंब सुशिक्षित करते तसच घरातील एक स्त्री व्यसनाधिन असेल तर ती अवघ कुटूंब व्यसनाधिन करू शकते अस म्हणता नाही का येणार ? इतक्यात तरी नाही. व्यसनांच्या दिशेने जर स्त्रियांची पावले वळ्त असतील तर त्यांना वेळीच आवर घालावा लागेल अन्यता आपल्या समाजाचं, देशाचं, आपल्या देशातील भावी पिढीचं आणि पर्यायाने स्त्रियांच भविष्यही धोक्यात येईल. त्याहूनही दखल घेण्याजोगी गोष्ट म्हणजे गुन्हेगारी आणि व्यसनाधिनता यांचा फारच जवळ्चा संबंध असतो त्यामुळे गुन्हेगारीतही मोठ्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. स्त्रियांच्या व्यसनाधिनतेचा काही लबाड पुरूष स्वतःच स्वार्थ साधन्यासाठी मोठ्या प्रमाणात उपयोग करून घेत असतात हे सत्य तर उगडच आहे. कोणतही व्यसन छोट-मोठ नसत व्यसन हे व्यसनच असत ते अजगरासारखं महाकाय असत एकदा का आपण ह्याच्या विळख्यात सापडलो की ते आपल्याला आज ना उद्या गिळंकृत करणारच….हे आजच्या स्त्रियांसोबत पुरूषांनीही लक्षात घ्यायलाच हवं !
— निलेश बामणे
Leave a Reply