नवीन लेखन...

व्हिताज बलसारा उर्फ व्ही.बलसारा

संगीतावर हुकूमत गाजविणारा कुशल कलाकार, प्रतिभासंपन्न संगीतकार व जागतिक कीर्तीचे पियानोवादक व्हिताज बलसारा यांचा जन्म २२ जुन १९२२ रोजी झाला.

व्हिताज अर्देशर बलसारा उर्फ व्ही. बलसारा हे पारशी असून सुद्धा व्ही.बलसारा यांनी एकेकाळी आपला हार्मोनियम, ऑर्गन व पियानोच्या अप्रतिम साथीने अवघ्या हिंदी फिल्मी संगीतावर हुकूमत गाजवली.

व्ही. बलसारा यांना हिंदी चित्रपटसृष्टीत जंटलमन म्युझीशयन म्हणत असत.
‘त्यांना संगीताचं बाळकडू आईकडून मिळालं. तीच पहिली गुरू. संगीताची गोडी त्यांना बालपणापासूनच होती. घरी पियानो नव्हता. गोव्याच्या शिक्षकांनी त्यांना पियानो व व्हायोलिनचं शास्त्रशुद्ध शिक्षण दिलं. गायनाचे प्राथमिक धडे त्यांनी फ्रामरोज श्रॉफ व पुढे बडोदा संस्थानचे उस्ताद बच्चूमियाँ यांच्याकडे गिरवले. १९३८ साल होतं. जुहूर राजा यांच्या ‘बादल’ चित्रपटासाठी बरेलीचे खानसाहेब मुश्ताक हुसैन संगीत दिग्दर्शक होते. ध्वनिमुद्रणाच्या वेळी त्यांचा नेहमीचा साजिंदा आला नाही, तेव्हा आयत्या वेळी व्ही. बलसारा पियानो वाजवण्यास बोलवले. तेव्हा वय होतं फक्त १६ वर्ष. व्ही. बलसारा यांच्या वादनशैलीवर खुश होऊन खानसाहेबांनी तिथल्या तिथे माझी दुय्यम सहायक म्हणून नेमणूक केली.’’ मा.व्ही.बलसारा यांनी ‘जिना सिखो’मध्ये पं. हनुमान प्रसादबरोबर, जुहूर राजासाठी ‘मझाक’मध्ये, ‘दोस्त’मध्ये सज्जाद हुसैनबरोबर, ‘रंगमहल’मध्ये मा.दत्ता कोरगावकर यांचा सहायक म्हणून काम केलं. त्यावेळी अॅ रेंजरचं नाव चित्रपटाच्या श्रेयनामावलीत येत नसे. मास्टर गुलाम यांनी मा.व्ही. बलसारा यांना स्वत:च्या मुलाप्रमाणे सांभाळलं. दत्ता कोरगावकर व मदन मोहननी सख्ख्या भावाचं प्रेम दिलं. शंकर-जयकिशननी तर अगदी ‘बरसात’पासून ते मुंबई सोडेपर्यंत एकही गाणं त्यांचे ऑर्गन अथवा हार्मोनियमवर असल्याशिवाय ध्वनिमुद्रित केलं नाही. मा.व्ही. बलसारा यांनी ‘‘‘आऽ इन्तजार हैं तेरा’ (बडी माँ), ‘चकोरी का चंदा से प्यार’ (दामन), ‘कोई प्रेम का दे के संदेसा’ (दोस्त), ‘कैसे कोई जिए’ (बादबान), ‘तारा री यारा री’ (दास्तान), ‘लो प्यार की हो गई जीत’ (जादू), याशिवाय शंकर-जयकिशन यांची ‘आवारा’, ‘बरसात’, ‘बादल’, ‘दाग’, ‘आंस’, ‘आह’, ‘पतिता’, ‘बादशहा’, ‘श्री ४२०’, ‘काली घटा’, ‘चोरी चोरी’ अशा अनेक चित्रपटांतील वाजवलेली गाणी अजून लोकांच्या लक्षात आहेत.’’ मा.व्ही.बलसारा हे पियानो, हार्मोनियमशिवाय व्हायोलिन, मेंडोलिनही वाजवत असत. त्या वादनामध्ये सतत ते निरनिगळे प्रयोग करीत असत. ते हार्मोनियमवर पाश्चिमात्य संगीत वाजव असत, त्यावेळी हार्मोनियमचा सूर अॅीकॉर्डियनसारखा येत असे. उदा. ‘ऐ मेरे दिल कही’ (दाग), ‘याद किया दिलने’ (पतिता) हे गाणं, पियानोवर जेव्हा ते वाजवत असत त्याला भारतीय संगीताची जोड देऊन तेव्हा पियानोवर सरोद, जलतरंग अथवा संतूरसारखा आवाज आणत असत. त्यांनी काउंटर मेलडी वाजवण्याची एक वेगळी शैली निर्माण केली ती सिनेशौकिनांना आवडली.’ १९४३ साली सर्कस गर्ल या चित्रपटाला संगीत देऊन मा.व्ही.बलसारा यांनी आपली संगीतकाराची कारकीर्द सुरुवात केली.ओ पंछी, रंगमहाल, मदमस्त, तलाश,चार दोस्त, विद्यापती और प्यार, अशा अनेक चित्रपटाना संगीत दिले. त्यांनी अनेक बंगाली चित्रपटाना सुद्धा संगीत दिले. मा.व्ही.बलसारा यांना ‘‘आयझ्ॉक डेव्हिड (स्पॅनिश मेंडोलिन), रामसिंग (सॅक्सोफोन), रामनारायण (सारंगी), अब्दुल करीम लाला (ढोलक व ढोलकी), कर्नाड, नार्वेकर (व्हायोलिन) यांसारखे अनेक कलाकारांनी साथ दिली. मा.व्ही.बलसारा यांचे निधन २४ मार्च २००५ रोजी झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट / मा.अरुण पुराणिक

व्ही.बलसारा

https://www.youtube.com/watch?v=thXUWWYPsMo

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..