रस्त्याने चालताना एकाकी,
स्पष्टच दिसत होत
आज तरूणींच गुलाबी रंगात रंगण …
त्यांच्या पायातील गुलाबी बुट
पाहिल्यावर का कोणास जाणे
हद कर दि आपने…म्ह्णावंस वाटल…
गुलाबी रंगाचा पोशाख
परिधान करण शक्य नव्ह्त ज्यांना
त्यांनी ओठांनाच गुलाबी करून सोडल…
कहींनी तर गुलाबी रंगाला
पर्याय म्ह्णून अगदी सहज
लाल रंगालाही जवळ केल…
गुलाबी मोबाईलवरून सुरू होत्या
काहींच्या गुलाबी गप्पा
तेंव्हा ओसंडून वाहत होत
त्यांच्या चेहर्यावरून गुलाबी हस्य…
माझ्या मनात विचार आला
ते सारं पाहून आता
आपण काय करावं
पण दुसर्याच क्षणी
माझ्या लक्षात आले
आपण तर काळा रंगाचा पोशाख
परिधान केलाय नेहमी सारखाच
निषेधाचा आज…
मनात किती आल तरी
गुलाबी पॅन्ट परिधान करणे
मला शकय नव्हते
आणि गुलाबी शर्ट मी
कालच वापरून झालो होतो
नेहमी सारखाच…
आता व्हॅलेन्टाईन डे
कसा साजरा करावा
म्ह्णून मी माझ्या
कित्येक वर्षापूर्वीच्या
गुलाबी वहया काढून वाचू लागलो
नेहमी सारखाच
त्यातील पानावर
गुलाबी नाही तर
लाळ अश्रू गाळ्त…
कवी – निलेश बामणे
Leave a Reply