नवीन लेखन...

व्हॅलेन्टाईन नावाचं भूत

  “प्रेम कर भिल्लासारखं बाणावरती खोचलेलं मातीमध्ये ऊगवून सुद्दा मेघापर्यंत पोचलेलं”शिरवाडकरांनी अतिशय सुंदर कविता लिहिली आहे. प्रेम या शब्दातच प्रचंड सामर्थ्य आहे. जगाला माहित असलेलं पहिलं प्रेमपत्र या हिंदुभूमीवर लिहिलं गेलं आणि ते प्रेमपत्र रुक्मिणीने भगवान श्रीकृष्णांना लिहिलं होतं. जगाला प्रेम अर्पण करण्याचा संदेश हा सुद्दा या हिंदुभूमीचाच. प्रेमाचा

इतका उदात्त हेतू आपल्या हिंदु संस्कृतीत आहे. आपली हिंदुभूमी म्हणजे साक्षात मुर्तीमंत प्रेमलता आहे. या हिंदुभूमीला कोटी कोटी प्रणाम.सध्या व्हॅलेन्टाईन डे च्या नावाने प्रेमवीरांच्या प्रेमाला प्रचंड महापूर आला आहे. प. पु. संत व्हॅलेन्टाईन हे ह्या प्रेमवीरांचे प्रेमगुरु. १४ फ़ेबृवारी हा त्यांचा प्रेमदिवस. म्हणजेच संत व्हॅलेन्टाईन ह्यांची पुण्यतिथी. आता हा व्हॅलेन्टाईन कोण होता हे ह्या प्रेमवीरांच्या बापाच्या बापालाही माहित नसेल. पण आम्हाला पाश्चात्यांची नक्कल करायची सवय लागली आहे आणि आम्ही ती प्रामाणिकपणे करीत आहोत.स्वातंत्र्यवीर सावरकरांनी सांगीतलं होतं की “इंग्रजांना आधि मनातून काढा, मग भावनेतून आणि नंतर भारतातून काढा”. आपण इंग्रजांना भारतातून काढलं पण मनातून मात्र काढू शकलो नाही. त्यामुळेच स्वातंत्र्यानंतर कॉंन्व्हेंट शाळांना ऊत आला. कॉंन्व्हेंट या शब्दाचा अर्थ ( a residence of community of fathers and nuns) असा होतो. अर्थातच कॉंन्व्हेंट स्कूल या शब्दाचा अर्थ ( a school run by fathers and nuns) असा होतो. आपण आपल्या मुलांना कॉंन्व्हेंट शाळेत (इंग्लिश मिडियम) घालतो, ह्याचा आपल्याला अभिमान वाटतो. पण आपण आपल्याच हातांनी आपल्या मुलांचं भवितव्य बिघडवत आहोत. ही जाणिव आपल्याला होत नाही. आणि कधि होईल अशी आशा सुद्दा नाही. कॉंन्व्हेंट शाळांच्या पडद्दा-आडून ख्रिस्ती धर्माचा प्रचार होत आहे. त्यातूनच हे “डे” साजरे क
ण्याचे दळभद्री प्रकार सुरु झाले. आणि व्हॅलेन्टाईन नावाचं भूत आमच्या मानगुटीवर बसलं. हा व्हॅलेन्टाईन कोण होता ह्याची माहिती प्रवचन भास्कर डॉ. सच्चिदानंद शेवडे लिखित “राष्ट्रजागर”मध्ये वाचली. ती येथे देत आहे.”ख्रिस्ती धर्म वाढण्याचा तो काळ. त्या काळात ’हीदन’ व ’पेगन’ लोकांना हाल हाल करुन मारले आणि बाटवले. हे लोक मुर्तीपुजक व निसर्गपुजक होते. इसवी सनाच्या तिस‍र्‍या शतकात रोमन सम्राज्यात ख्रिस्ती वर्चस्व वाढू लागले. या काळात ’क्लॉडियस दुसरा’ हा राजा होता. रोमन साम्राज्यात गृहयुद्दे व बाहेरील आक्रमणे चालू होती. म्हणून त्या देशाला तरूणांची सैन्यात भरती करण्याची आवश्यकता वाटू लागली. पण तरूणांचे सैन्य भरतीचे प्रमाण खुपच कमी होते. हे सर्व प्रेम अथवा लग्न ह्यामुळे होत असावे, ज्या वेळी राष्ट्राला सैन्याची गरज होती त्यावेळी सगळेजण भौतिक सुखात लोळत होते. म्हणून राजाने लग्नावर बंदी घातली. राष्ट्रभिमानी राजाविरुद्द जनमत एकवटावे यासाठी व्हॅलेन्टाईन आणि मेरियस यांनी बंदी झुगारुन तरुणांची लग्ने लावली. हा उघडपणे राष्ट्रद्रोह होता. यामुळे राजाने त्यांना पकडले आणि शिरच्छेदाची शिक्षा सुनावली. या राष्ट्रद्रोही व्हॅलेन्टाईनने तुरुंगाधिकाराच्या मुलीला सुद्दा नादी लावले. मरण्यापूर्वी लिहिलेल्या पत्राखाली त्याने love from your valantine असे लिहिले होते म्हणे. १४ फ़ेबृवारी २७० मद्दे त्याचा शिरच्छेद केला. पुढे ब‍र्‍याच काळानंतर व्हॅटिकनने त्याला संतपद दिले. १४ फ़ेबृवारी हा “ज्युनो” नामक रोमन देव-देवतांच्या राणिचा गौरव दिवस होता. तोच ह्या ख्रिस्ती आक्रमकांनी ’व्हॅलेन्टाईन डे’ ठरवून र मन मुर्तींचा विध्वंस केला, मुर्तिपुजक व निसर्गपुजकांना ठार मारले, बाटवले, स्त्रीयांवर बलात्कार केले, त्यांची नग्न धिंड काढली.” तर हे होते व्हॅलेन्टाईनचे चरित्र. अहो अशा लोकां
द्दे प्रेमभावना कशी असू शकते? आणि हा असला व्हॅलेन्टाईन प्रेमाचा प्रतिक कसा असू शकतो? व्हॅलेन्टाईन प्रेमसंत आहे, असे जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे प्रेम विक्षिप्त आहे.अशुद्द बीजापोटी फ़ळे कडवट रानटी. जर बीज अशुद्द असेल तर फ़ळे कडवट आणि रानटीच असणार. मॅकोलेने सांगितले होते की “Give them your education and see within the period of thirty years they will forget themselves”. आज खरच आपण स्वताला विसरलो आहोत. आपल्याला जे शिक्षणाचं बीज पेरलं गेलं तेच मुळात अशुद्द होतं. अहो, आज इंग्लंडमधील तीन युनिवर्सिटींनी व्यवस्थापन शास्त्रातील आदर्श ग्रंथ म्हणून रामदास स्वामींच्या दासबोधाला आपल्या आभ्यासक्रमात लावला आहे. आणि आपण मात्र आपला वेळ “रोज डे” “व्हॅलेन्टाईन डे” असल्या फ़ालतु गोष्टींवर घालवत आहोत. वाईट तितुके इथे पोसले भलेपणाचे भाग्य नासले, अशी आपली स्थिती झाली आहे.एकदा वाराणसीच्या कुंभ मेळ्यात काही विदेशी आले होते. त्यांनी हिंदुंना विचारले “तुम्ही चपला का नाही घातल्या?” त्यावर हिंदु म्हणाले “देवळात जाताना चपला घालायच्या नसतात”. त्या विदेशींनीही चपला घातल्या नव्हत्या. तेव्हा हिंदुंनी विदेशींना तोच प्रश्न विचारला. यावर विदेशी म्हणाले “आम्ही भारत देशालाच देवळासमान मानतो. म्हणून आम्ही आमच्या चपला आमच्या देशातच काढून आलो अहोत.” अहो जर विदेशी लोक आपल्या देशाला देवालय मानतात, तर मग आपण आपल्या देशाचं मद्दालय का केलं आहे? नुकतंच ख्रिस्ती नवीन वर्ष साजरं झालं. ३१ डिसेंबरच्या रात्री किती दारुच्या बाटल्या फ़ुटल्या? सरकारनेच परवानगी दिल्यावर म्हणायलाच नको. पण दारु लागतेच कशाला? आपण जर सुखात आणि दुःखात स्वताच्या पायावर ऊभे राहू शकलो नाही तर कसले पुरुष आपण? षंढच नव्हे का? असो, तो प्रत्येकाचा वैयक्तीक प्रश्न आहे.प्रभू रामचंद्रांच्या जन्मापूर्वी रामनामाचा जप केला आणि वाल्या कोळ्याचे रुपांतर वाल्मिकी ऋषिंमद्दे झा
ले, ही आपली संस्कृती आहे. अहो, हिंदुधर्म हा मोदकासारखा आहे. बाहेरुन चाटल्यावर त्याचा गोडावा नाही कळायचा. गाभा‍र्‍यातील रस खाल्यावर कळतं, किती गोड आहे ते. माझ्या तरुण बांधवांना आणि भगिनींना एव्हढीच हात जोडून विनंती आहे की त्यांनी प्रभू रामचंद्रांचा आदर्श ठेवावा, हिंदु संस्कृतिचा आदर्श ठेवावा आणि व्हॅलेन्टाईन नावाचं भूत आपल्या मानगुटीवरून

कायमचं उतरवून टाकावं. ज्यांना हा लेख वाचून शहाणपण आलं असेल त्यांना अभिनंदन आणि ज्यांना अजूनही शहाणपण सुचलेलं नाही त्यांना “हॅप्पी व्हॅलेन्टाईन डे”.धन्यवाद……….लेखक: जयेश मेस्त्रीसंपर्क: गिरिश केणी चाळ,पन्नालाल घोश मार्ग,सुहास टेरेसच्या बाजूला,राजनपाडा, मालाड (प).मुंबई- ४०००६४.मोबाईल: ९८३३९७८३८४.ई-मेल : smartboy.mestry@gmail.comjaysathavan@gmail.comblog: akhandhindusthanmahasabha.blogspot.com

— जयेश मेस्त्री

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..