पुणे मुंबई महामार्गावर लाल टॅाप घातलेली ती गाडीला टेकून पुस्तक वाचीत उभी होती.
च्यायला काय माल आहे, कदाचित कुणी नटी असावी! त्याने बाईकची स्पीड वाढवली आणि डोळ्यांना डोळे भिडताच एक हवाई चुंबन तिच्या दिशेने फेकले. तिने ही हाताने चुंबन हवेत उडवित प्रत्युत्तर दिले.
च्यायला पोरगी पटली. …अररे… समोर वळण आहे तो विसरला होता. बाईक रोड डिवाईडर वर आपटली आणि तो दुसर्या बाजूला फेकल्या गेला.
किर्रर्र.. माझ्याच गाडी खाली यायचं होत का? आता बोंबला – ट्रक ड्राईवर.
आईग! तिने डोळे मिटले. क्षणभराकरता तिला वाटले आपला चेहरा घामा ऐवजी रक्ताने डबडबलेला आहे. तिचे लक्ष पुस्तकाच्या कवरवर गेले. मोठ्या अक्षरात लिहिले होते ‘विषकन्या’.
— विवेक पटाईत
Leave a Reply