कोणतेही पुस्तक मी सह्सा संपूर्ण वाचून झाल्याखेरीज हाता वेगळे करत नाही आणि एकदा वाचलेले पुस्तक पुन्हा वाचायला शक्यतो घेत ही नाही. पण ‘शरसंधान’ हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक मी तीन वेळा वाचले. ‘
शरसंधान’ हे ह्लके-फुलके पुस्तक असले तरी समजायला जड आणि पचायला अवघड आहे. हे पुस्तक आपल्या बुध्दीचा किस काढण्याबरोबर बुध्दीचा कस लावण्यास प्रवृत्त करते. कोणत्याही पुस्तकाबद्दलची मी माझी प्रतिक्रिया कधीच कोठे दिली नाही की कोठे लिह्ली ही नाही कारण लेखक कोणी का असेना त्याने निर्माण केलेलं साहित्य माझ्या दृष्टीने बहूमोलच असतं.
‘शरसंधान’ पुस्तकाच्या निर्मितीत माझा खारीचा वाटा आहे अस या पुस्तकाचे लेखक जयेश मेस्त्री मानतात. पण खरं सांगायच तर मला ते माझ्या लहान भावासारखे आहेत. सावरकरांच्या बाबतच्या त्यांच्या ज्ञानाचा मी प्रचंड आदर करतो. त्यांचे लेखन मी सातत्याने वाचत आलेलो आहे राजकारणा सोबत ते इतर विषय अगदी विनोद ही उत्तम हाताळतात. हे पुस्तक प्रकाशित होण्यापुर्वी ही माझ्या हातात आले होते पण ते वाचण्याचा मोह मी त्यावेळी टाळला. पण पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जेंव्हा जयेशने त्या पुस्तकाची प्रत मला भेट दिली तेंव्हा मी ते पुस्तक पचेपर्यंत वाचले.
जयेश जरी नवोदित लेखक असला तरी तो नवखा नाही त्याने यापुर्वी बरेच लिखाण केलेले आहे. प्रचंड अभ्यास आणि निरीक्षणातून त्याचे हे ‘शरसंधान’ पुस्तक जन्माला आलेले आहे. हे पुस्तक म्ह्णजे एक उत्तम लेखक म्ह्णून नावारूपाला येण्याच्या दृष्टीने त्याचे पहिले पाऊलच म्ह्णावे लागेल. जयेशच्या पहिल्याच पुस्तकाला लाभलेली ज्येष्ठ पत्रकार, लेखक, वक्ते आणि समिक्षक श्री.अरविंद कुलकर्णी यांची प्रस्तावना बरेच काही सांगून जाते. त्याच सोबत जयेश मेस्त्री यांच्या लिखाणाचा दर्जाही अधोरेखीत करते. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत जयेश मेस्त्री यांची पाठ थोपटण्याबरोबरच त्यांच्या हिंदूतत्वनिष्ठतेचे कौतुक करत जयेश मेस्त्री सावरकरांच्या विचारांनी प्रभावित आहे हे सांगायला विसरलेले नाहीत. या पुस्तकाला लाभलेली प्रस्तावनाच एक वाचनिय लेख आहे असे म्हटले तर ते ही वावगे ठरणार नाही.
जयेश मेस्त्री यांनी आपले हे पुस्तक स्वा.सावरकर आणि बाबा आमटे आणि परिवाराला समर्पित केलेले आहे यावरून त्यांना समाजसेवेचाही वारसा लाभलेला आहे हे स्पष्ट होते. या पुस्तकात जयेश मेस्त्री यांच्या आवघ्या सहा लेखांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकाच्या सुरूवातीलाच त्यांच्या या पुस्तकाला किशोर नार्वेकर आणि डॉ.शांताराम कारंडे यांनी काव्यात्मक शुभेच्छा दिलेल्या आहेत. डॉ. शाताराम कारंडे यांनी या पुस्तकाला अर्थसहाय्य करून त्याच्या निर्मितीत मोलाची भुमिका बजावलेली आहे.
या पुस्तकातील पहिला लेख ‘आशीर्वाद देऊ की घेऊ ?’ हया लेखात लेखकाने एक प्रगत राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदाचे चरित्र आजच्या पिढीने स्विकारण्याची गरज का आहे या बद्दल आपले परखड विचार मांडलेले आहेत. ‘कृष्णा तुला शोधू कोठे’ हा लेख भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राकडे वर्तमान पिढीने कसं डोळ्सपणे पाहायला हवे या बद्दल मार्गदर्शन करताना दिसतो. त्यापुढील पत्रकारीताः लोकहित की व्यवसाय या लेखात ते पत्रकारीता हा फक्त एक व्यवसाय बनून न राहता पुर्वीसारखीच त्याला राष्ट्रभक्तीची आणि राष्ट्रप्रेमाची जोड असावी असा आशावाद लेखकाने व्यक्त करताना बर्या च दुर्लक्षीत गोष्टी प्रकाशात आणण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केलेला आहे. ‘तहानलेला सावरकर’ हा या पुस्तकातील चवथा लेख सावरकरांवर प्रेम करणार्यां ना नव्याने त्यांच्या प्रेमात पडायला प्रवृत्त करेल अशी खात्री वाटते. या पुढील लेख ‘अखंड भारत का आवश्यक आहे?’ या प्रश्नाच उत्तर जाणण्यास सारेच उत्सुक असतात. वाचकांची ही उत्सुक्ता दूर करण्याचा प्रयत्न लेखकाने या लेखाच्या माध्यमातून केला आहे. अखंड भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण हे स्वप्नवत असतानाही तसा आशावाद दाखविण्याचा लेखकाचा प्रयत्न नक्कीच स्तुती करण्यासारखा आहे. या पुस्तकातील शेवटचा लेख ‘तुंम्हाला गांधी हवेत की सावरकर?’ या प्रश्नाचे उत्तर देणे तसे अवघडच पण जयेश मेस्त्री यांनी ठामपणे सावरकरांची बाजू उचलून धरल्याचे या लेखात स्पष्ट दिसते. त्यांचे सावरकर प्रेम हे वरवरचे नाही तर त्यांनी सावरकरांचा अभ्यास मनापासून केलेला आहे आणि त्या अभ्यासातूनच या लेखाचा जन्म झालेला आहे.
जयेश मेस्त्री यांचे हे अठ्ठेचाळीस पानाचे छोटेसे पुस्तक वाचकांनी वाचण्यासाठी हाती घेतल्यावर ते संपूर्ण वाचल्याखेरीज ते ते हातावेगळे करणार नाहीत याची मला खात्री वाटते. त्यातील काही वाचक हे पुस्तक आपल्या हृदयालाही कवटाळतील का ते? हे पस्तक वाचल्यावरच वाचकांच्या लक्षात येईल त्यामुळे प्रत्येक मराठी वाचकाने हे पस्तक नक्कीच वाचायला हवे…
– निलेश बामणे
Leave a Reply