मानवी शरीर हा मौल्यवान परिस आहे. या परिसाला लोखन्डाचा स्पर्श झाला की त्याचे सोने होते. सुन्दर विचार, उच्चार व आचार या सर्वानी भारलेला शरीररुपी परिस विश्वात कोठेही गेला तरी तो आपल्या अलौकिक सामर्थ्याने तेथील परिस्थिती व वातावरण सोनेरी करील. उत्तम शिक्षण, शिकवण व सन्स्कार यान्च्याद्वारा शरीररुपी
परिस बालपणापासून प्रभावीपणे भारला गेला पाहिजे. याउलट
निकृष्ट दर्जाचे शिक्षण, अनिष्ट शिकवण, अङ्यान, अन्धश्रद्धा या गोष्टीनी भारलेला शरीररुपी परीस जेथे स्पर्श करील त्या सर्वान्ची माती करील.
थोडक्यात, शरीररुपी परिस असा विलक्षण आहे की, स्पर्श करुन सोने करण्याचे किन्वा माती करण्याचे प्रचन्ड सामर्थ्य त्याच्या ठायी वास करते.
— प्राजक्ता विवेक चम्पानेरकर
Leave a Reply