नवीन लेखन...

शरीराचा आकार आणि आहार

काही लोकांच्या शरीरामध्ये कमरेच्या वरच्या भागात तर काही लोकांच्या कमरेच्या खालच्या भागात अधिक चरबी असते. तसेच काही लोकांमध्ये लवकर चरबी वाढत नाही. तज्ज्ञांच्या मते, माणसाचे शरीर एकसारखे नसते, त्यामुळे असे होते. प्रत्येकाच्या शरीराचा आकार वेगळा असतो. त्यामुळे भोजन पद्धतीही त्यानुसारच असायला पाहिजे. सर्वांच्या शरीरातील वेगवेगळ्या भागांत चरबी वाढत असते. त्यामुळे ती नियंत्रित करण्यासाठी शरीराच्या गरजाही वेगवेगळ्या असतात.

अॅपल शेप (सफरचंदाचा आकार)

या आकाराचे शरीर चारही बाजूंनी गोलाकारात पसरलेले असते. हा आकार अनुवांशिक असतो आणि यामध्ये छाती आणि खांदे रुंद असतात. याउलट कमरेच्या खालच्या भागात म्हणजेच पायांमध्ये कमी चरबी असते. तज्ज्ञांच्या मते, या शरीराच्या आकारात बॅली फॅट कमी करण्यासाठी अत्यंत मेहनत करावी लागते; परंतु खाली दिलेल्या टिप्सच्या माध्यमातून त्यावर नियंत्रण मिळवता येऊ शकते.

• जर तुमचे आतडे अधिक संवेदनशील असतील तर अल्कोहोलचे सेवन करणे तुमच्यासाठी हानिकारक ठरू शकते. अशावेळी तुम्हाला ही सवय सोडून द्यावी लागेल. अशा स्थितीत झोपेशी संबंधित समस्या वाढायला लागतात.

• या आकारासाठी प्रोबायोटिक फूड अत्यंत फायदेशीर आहे. यामध्ये फॅट कमी असतात पोषक द्रव्ये अधिक असतात. त्यामुळे पचनक्रिया चांगली राहते. तसेच पोटही साफ होते.

• भरपूर पाणी पिल्याने पचनक्रिया चांगली राहील. तसेच शरीरात भरपूर पाणीही राहील. डायट, सोडा यासारख्या काबरेनेटयुक्त पेयपदार्थांचे सेवन करू नये. कारण यामुळे पोट फुगते.

बनाना शेप (केळीचा आकार)
केळीच्या आकाराचे शरीर असलेले लोक हडकुळे आणि उंच असतात. या लोकांनी काहीही खाल्ले तरी त्यांच्या शरीरावर जास्त परिणाम होत नाही. तसेच या लोकांचे स्नायूही अत्यंत कमी असतात. या लोकांनी योग्य आहार घेतला नाही तर त्यांना लवकर थकवा येतो. त्यामुळे त्यांनी खालील बाबी लक्षात ठेवाव्यात.

• स्नायू वाढवण्यासाठी प्रथिनयुक्त खाद्यपदार्थांचे सेवन करावे. ग्रिल्ड चिकन, उकडलेली अंडी यांचा आहारात समावेश करावा.

• या आकाराच्या लोकांनी आपल्या भोजन पद्धतीबाबत विशेष काळजी घेतली पाहिजे. रक्तात साखरेचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे, अशा लोकांचे वजनही लवकर वाढत नाही, त्यामुळे काळजी करण्याचे कारण नाही. या लोकांनी बाहेरील खाद्यपदार्थ खाण्याचे टाळावे.

• आरोग्यदायी मेद/ प्रथिनयुक्त पदार्थांचे सेवन करावे. सर्व प्रकारच्या धान्यापासून तयार करण्यात आलेले पॉपकॉर्न, बदाम, दही आणि अँव्होकॅडो यासारख्या फळांचे सेवन करावे.

पीअर शेप (नाशपाती फळासारखा आकार)
पेरूसारखे दिसणार्‍या नाशपाती या फळासारखा आकार असणार्‍या लोकांचे शरीर वरच्या बाजूने अरुंद आणि कमरेच्या खालच्या बाजूने रुंद असते. अशा लोकांचे जेव्हा वजन वाढते तेव्हा पोटाच्या खालचा भाग, कंबर आणि मांड्या जड व्हायला लागतात. मेदयुक्त दुग्धजन्य उत्पादने आणि गोड पदार्थ ही या लोकांची कमकुवत बाजू आहे. अशावेळी या लोकांना खालील उपाय करायला पाहिजेत.

• आइस्क्रीममध्ये मेद आणि साखर जास्त असते, त्यामुळे याऐवजी कमी गोड असलेल्या फ्रोजन योगर्ट यासारख्या खाद्यपदार्थांचे सेवन करावे.

• दुग्धजन्य पदार्थांमध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात. त्यामुळे या पदार्थांचे भरपूर सेवन करावे. एक औंस चीजमध्ये 100 कॅलरी आणि आठ ग्रॅम फॅट असते.

त्यामुळे याचे सेवन कमी फॅट असलेल्या क्रॅकर्ससोबत केले जाऊ शकते.

• अपचन होईल अशा पदार्थांपासून दूरच राहावे. दिवसातून किती वेळा जेवण करता, याकडेही लक्ष ठेवावे.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३१७३३
संदर्भ.इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..