आज २४ ऑक्टोबर. आज अनेक ख्यातनाम गायकांच्या कौतुकाचा विषय ठरलेली शास्त्रीय गायिका कौशिकी चक्रवर्तीचा वाढदिवस.
कौशिकीचा जन्म २४ आक्टोबर १९८० रोजी झाला. पं. अजय चक्रवर्ती यांच्या त्या कन्या.
पतियाळा घराण्याचे गायक पंडित अजय चक्रवर्ती, आई चंदना चक्रवर्ती संगीत शिक्षक, घरातच गाणे, वयाच्या २ र्या वर्षापासून तिने संगीत शिकण्यास सुरूवात केली. ऋतुपर्ण घोष या प्रसिद्ध बंगाली दिग्दर्शकाने [‘रेनकोट, चोखेर बाली’] देवू केलेल्या प्रमुख नायिकेच्या ऑफरला नम्रपणे नकार देणार्या कौशिकी चक्रवर्तीच्या शास्त्रीय संगीत सेवेला सलाम केला पाहिजे. क्रवर्ती यांच्यासह प्रसिद्ध गायिका आरती अंकलीकर-टिकेकर, पं. भीमसेन जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास जोशी, गायक उपेंद्र भट, आनंद भाटे उपस्थित होते. ‘बिहाग’ रागगायनानंतर त्यांना ‘रंगी सारी गुलाबी चुनरिया रे’ ही ठुमरी गाण्याची फर्माईश झाली. मात्र, पं. अजय चक्रवर्ती यांनी कौशिकी यांना ‘याद पिया की आए’ ही ठुमरी गाण्याचा आग्रह केल्यावर त्यांनी ती नजाकतीने पेश केली.
कौशिकी २००६ मधील त्यांच्या पहिल्या मैफलीच्या आठवणी सांगताना म्हणते, एक दिवस मी घरी असताना दूरध्वनी वाजला. मी तो घेतला. ‘मैं भीमसेन जोशी बोल रहा हूँ. इस साल हमारे यहाँ पूना आना पडेगा’ असा पलीकडून आवाज आला. पंडितजी मला दिसत नसले तरी मी जागेवरच उभी राहिले होते.
कौशिकीसारख्या गायिकांच्या हातात हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत सुरक्षित आहे, अशी खुद्द पं. भीमसेन जोशी यांनी दिलेली पावती हे कौशिकीचे यश आहे. आज तिचे नाव तिची या क्षेत्रातील तपस्या तसेच सौंदर्य या दोन्ही मुळे देशविदेशात गाजत आहे.
तिचे पती पार्थ देशीकान हे स्वतः उस्ताद बडे गुलाम अली खाँ यांच्या परंपरेतील उदयोन्मुख गायक असून त्यांनीही कौशिकीप्रमाणेच आपले सासरे पं.अजय चक्रवर्ती यांचेच शिष्यत्व पत्करले आहे.
कौशिकीने देशात परदेशात अनेक मैफीली गाजवल्या आहेत. गाणारं सौंदर्यच हे! जे तिचे कार्यक्रम बघतात ते तिचे फॅन होतात. कौशिकीला आपल्या समूहातर्फे वाढदिवसाच्या शुभेच्छा.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ.इंटरनेट
Leave a Reply