क्वचित चाळीत हल्ली
शेव, चकली, चिवडा आणि लाडूचा
घमघमीत सुगंध सर्वत्र दरवळतो,
आणि दिवाळी जवळ आल्याचा भास होतो !
रात्रीची जेवणं झाल्यावर
चाळीच्या मधल्या पॅसेजमध्ये
नेहमी प्रमाणे गप्पांनी जोर धरला
!
थोर मोठ्यांच्या कोमेंट्स सुरु झाल्या !
आपल्या वेळी असे नव्हते !
एकाने विचारले असे म्हणजे कसे?
सुगंधी उटण्याची जागा साबणाने घेतली,
पहाटे लौकर उठून अंघोळीची घाई सरली !
रांगोळीने तर कातच टाकली
कसलेसे स्टिकर्स आली !
ठिपक्यांची रांगोळी विसरल्या ललना,
रत्यावरील झाकण्यानेही जमेना !
मुले कंदील करण्याचे विसरून गेली,
बाजारातून विकत आणू लागली !
आयांना हल्ली कुठे वेळा असतो,
दिवाळीचा फराळ मॉलमधून आणायचा असतो !
मातीचे किल्ले बनविण्यातून कळत होता
श्री.शिवछत्रपतींवरील दृढ विश्वास आणि निष्ठा,
आणि मावळ्यांचा शूर पराक्रम,
नकळत अंगीबाणत होते तरुणांत देश प्रेम !
सगळ्यांचे फराळ एकाच मॉलमधले
फराळाला एकमेकांकडे जाणे थांबले !
नवीन पँट-शर्ट घालून मिरवणे
कधीच इतिहास जमा झाले !
फुलबाजा, हातचक्र, भुईचक्र, अनार
यांचे नाही मुलांना प्रेम !
कर्णकर्कश विविध फटाक्यांचे
लय भारी प्रेम !
मोठया आवाजाच्या फटक्यांनी
होतय ध्वनी आणि वायू प्रदूषण !
पण त्याचे आम्हांला नसेत भान,
जीवावर बेतले की फुटतो घाम !
एकाने म्हंटले
तरी मला आशा आहे या तरुण पिढीवर,
भरकटले असतील आत्ता
पण येतील भविष्यात ठिकाणावर !
जगदीश पटवर्धन, बोरीवली (प)
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply