हिमालयाच्या शिखरावर हे ज्योतिर्लिंग वसलेलं आहे. इथे जाण्याचा रस्ता फारच कठीण आहे. या ठिकाणी कायम हिमवर्षाव होत असतो. आणि म्हणूनच या लिंगाचं दर्शन एका विशिष्ट वेळेलाच होतं.
या स्थळाची एक विशिष्ट गोष्ट म्हणजे या ठिकाणी एक त्रिकोणी दगड आहे ज्याच्याबद्दल एक पुरातन कथा प्रसिद्ध आहे. “महाभारत हे युद्ध संपल्यानंतर त्याचं प्रायश्चित्त घेण्यासाठी पांडव येथे आले होते. तेव्हा त्यांना या ठिकाणी एक रेडा आढळून आला. त्या रेड्याला भगवान शिव समजून हे पांडव त्याच्या पाठीमागे धावू लागले. रेडा पळता-पळता एका खिंडीमध्ये येऊन पोहोचला. त्याचं तोंड खिंडीच्या बाहेर गेलं. पण भीमाने आपल्या शक्तीच्या जोरावर त्याची शेपटी पकडून ठेवली. शेवटी ह्याचा परिणाम असा झाला की, त्या रेड्याचं तोंड नेपाळच्या दिशेनं गेलं आणि बाकी शरीर या ठिकाणीच राहिलं. नेपाळमध्ये याचं जे तोंड आहे त्याला पशुपतीनाथ म्हणतात.
— मराठीसृष्टी
Leave a Reply