या गणेशाची स्थापना पार्वती मातेने स्वहस्ते केली. येथे ज्या गुहेत तिला श्री गणेश प्रसन्न झाले त्याच गुहेत तिने श्री गणेशाची स्थापना केली. हे स्थान उंच डोंगरावर असून लेण्यांच्या स्वरुपात आहे. गिरीजा म्हणजे पार्वती. मत आणि पार्वतीचा पुत्र गणेश म्हणजे तिचा आत्मज. त्यावरून त्यास गिरिजात्मज म्हटले जाऊ लागले. गजाननाची पुत्र म्हणून प्राप्ती व्हावी म्हणून या गुहेत पार्वतीने बारा वर्षे तपश्चर्या केली व गणेशाच्या पार्थिव मूर्तीची पूजा केली. त्यानुसार भाद्रपद चतुर्थीस सचेतन होऊन बटुरुपात तो प्रकट झाला तेव्हा त्याला सहा दात व तीन नेत्र होते. गौतम ऋषींचा गणेशास येथे लाभ झाला. सतत १५ वर्षे गणेशाने वास्तव्य केले म्हणून या क्षेत्राचे महात्म्य थोर आहे. येथे एकूण २८ लेण्या आहेत. मंदिर सातव्या लेणीत असून त्याला गणेश लेणी म्हणतात. ६ व्या लेणीत बौद्ध स्तूप असून येथे सात वेळा आवाजाचा प्रतिध्वनी उमटतो. लेणीस जाण्यासाठी ३२१ पायर्या आहेत. गणेशाची मूर्ती लेणीच्या भिंतीत स्वयंभू प्रकट झालेली आहे. लेणी परीसर पुरातत्त्व विभागाच्या अधिकारात आहे. मंदिरात प्रवेशासाठी पुरातत्त्वविभाग पाच रुपये शुल्क आकारते.
जुन्नरजवळ लेण्याद्री हा लेणी असलेला पर्वत असून गिरीजात्मजाचे मंदिर डोंगरावरील आठव्या गुहेत आहे. देवळात जाण्यासाठी ३६७ पायर्या आहेत. डोंगरात कोरलेले हे मंदिर अखंड अशा एकाच दगडात कोरलेले असून दक्षिणाभिमुख आहे. दालनात गणपतीची प्रतिमा असून त्याला एकही खांब नाही. तसेच दालन आकाराने मोठे आहे. या मंदिराचे वैशिष्ट्य असे की सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत या गिरीजात्माजाच्या मूर्तीवर उजेड असतो. मंदिरात दगडात खोदलेली गिरिजात्मजाची उत्तराभिमुख व ओबडधोबड मूर्ती असून गणेशाची मान डाव्या बाजूला वळलेली असल्याने गणपतीचा एकच डोळा दिसतो.
अष्टविनायका पैकी सहावा गणपती लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज. जुन्नर तालुक्यातील जुन्नर लेण्यांच्या समुदायात आणि कुकडी नदीच्या परिसरात डोंगरावर श्री गिरिजात्मज गणेशाचे हे स्वयंभू स्थान आहे. श्री गणेशाची प्रसन्न मूर्ती असून ती दगडामध्ये कोरलेली आहे. मंदिर परिसरातील खडकामध्ये कोरीवकाम, खोदकाम केलेले आहे. पेशवे काळात या मंदिराचा जिर्णोद्धार झाला होता. मंदिरात दगडी खांब आहेत व त्यावर वाघ, सिंह, हत्ती असे सुंदर नक्षीकाम केलेले आहे. मंदिरात जाण्यासाठी डोंगरावर सुमारे ४०० पायर्या आहेत.
लेण्याद्रीचा श्री गिरिजात्मज हा जुन्नरपासून ७ कि.मी. अंतरावर आहे, तर पुण्यापासून सुमारे ९७ कि. मी. अंतरावर हे ठिकाण आहे.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply