शिवलीलामृत, स्तोत्ररत्नकार, गुरुचरित्र यासारख्या ग्रंथातून या ज्योतिर्लिंगाचा महिमा वर्णिलेला आहे. इतकेच नव्हे तर श्री ज्ञानेश्वर, श्री समर्थ रामदास, श्रीधर स्वामी व संत नामदेवांनीही या शिवतिर्थाचा उल्लेख केला आहे.
पुणे जिल्ह्यात सह्याद्रीच्या उंच कड्यावर वसलेलं अतिशय निसर्गरम्य व पवित्र असे हे ठिकाण आहे. या तिर्थाविषयीची कथा थोडक्यात अशी –
त्रिपूरासूर नावाचा एक दैत्य उन्मत्त होऊन लोकांना त्रास देऊ लागला तेव्हा शंकराने महाप्रचंड असे भीमरुप धारण करुन त्या दैत्याला ठार मारले. युद्धानंतर भगवान शंकराला भयंकर थकवा आला व विश्रांती घेण्यासाठी ते इथेच राहिले म्हणून या क्षेत्राला भीमाशंकर असे नाव पडले.
— मराठीसृष्टी
Leave a Reply