देव-दानवांनी केलेल्या समुद्रमंथनातून १४ रत्नांबरोबर धन्वंतरी व अमृत ही दोन रत्नेही त्यातच होती. अमृत पिण्यासाठी राक्षस प्यायले. पण भगवान विष्णूने अमृतासह धन्वंतरीला या शिवलिंगात गुप्तपणे लपविले. (म्हणून इथल्या शंकराला अमृतेश्वर किंवा वैद्यनाथ असं नाव पडलं असावं) त्या शिवलिंगाला राक्षसांनी हात लावताच त्यातून ज्वाला बाहेर येऊ लागल्या पण देवांनी हात लावल्यावर मात्र अमृताच्या धारा पाझरू लागल्या.
त्यामुळेच इथल्या पिंडीला हाताने स्पर्श करुन दर्शन घेण्याची प्रथा आहे. खरं तर शंकराला बेल व विष्णूला तुळस अतिप्रिय पण या ठिकाणी मात्र शिवाला तुळस आणि भगवान विष्णूला बेल वाहण्याची प्रथा आहे. मराठवाड्यातील परळी येथे हे शिवाचे जागृत ठिकाण असून शिव पार्वतीसह इथे राहतो अशी भाविकांची श्रद्धा आहे. या स्थळाला “जगाआगळी” काशी असेही म्हणतात.
— मराठीसृष्टी
Leave a Reply