भीमा नदीकाठी हे सिद्धिविनायकाचे मंदिर वसलेले आहे. या ठिकाणी विष्णूला सिद्धी प्राप्त झाली म्हणून या गणपतीला सिद्धिविनायक आणि या परिसराला सिद्धटेक असे म्हंटले जाते. भगवान विष्णूने येथील गणेश मूर्तीची स्थापना केली. मधु व कैटभ या दैत्यांचा वध करण्यासाठी श्री विष्णूने येथे विनायकाची आराधना केली. विष्णूस येथे सिद्धी प्राप्त झाली म्हणून येथील गणेशास सिद्धीविनायक म्हंटले जाऊ लागले. येथील दक्षिणवाहिनी असणार्या भीमा नदीला पूर आला तरी परिसरात नदीच्या प्रवाहाचा आवाज होत नाही. या नदीवरील दगडी घाट अहिल्याबाई होळकर यांनी बांधला. अष्टविनायकांपैकी उजव्या सोंडेची असणारी ही एकमेव मूर्ती असल्याने तिचे सोवळे कडक आहे. गणेशास सकाळी खिचडी, दुपारी महानैवेद्य, संध्याकाळी दुध भात, व रात्री भिजलेल्या डाळीचा नैवेद्य असतो. हे मंदिर उत्तराभिमुख आहे. मंदिराच्या महाद्वारावर नगारखाना आहे. महाद्वारातून आत गेल्यावर सभामंडप असून त्यापुढे गाभारा आहे. गाभार्यात उजव्या सोंडेची व शेंदूर लावलेली सिद्धिविनायकाची मूर्ती आहे. त्याची एक मांडी दुमडलेली असून त्यावर रिद्धी-सिद्धी बसलेल्या आहेत. गाभार्यातील मखर पितळी असून त्यावर चंद्र, सूर्य, गरुड, नागराज यांच्या आकृती कोरलेल्या असून दोन्ही बाजूला जय-विजय आहेत.
सिद्धटेकचा श्री सिद्धिविनायक हा अष्टविनायकांपैकी तिसरा गणपती. हे भीमा नदीवर वसलेले सिद्धिविनायकाचे स्वयंभू स्थान आहे. याचा गाभारा लांबी-रुंदीने भरपूर मोठा आहे. तसेच मंडपही मोठा-प्रशस्त आहे. पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांनी जिर्णोद्धार करून मंदिर बांधले आहे. मंदिरात पितळी मखर असून त्याभोवती चंद्र-सूर्य-गरूड यांच्या प्रतिमा आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात हे ठिकाण असून दौंडपासून ९९ कि. मी. अंतरावर आहे. तर राशिनपासून १४२ कि. मी. आहे.
मंदिर उत्तराभिमुख असून गाभारा मात्र प्रशस्त आहे. जवळच भीमा नदी असल्याने या नदीच्या परिसरात सुंदर घाट बांधण्यात आले आहेत. जवळच विष्णू, शिवाई, महादेव आदि देवांची मंदिरे आहेत.
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply