बसची वाट पाहत कुडकुडत रस्त्यावर उभ होत. बस आली, बस मधे ही थंडी मुळे देवाचे संक्रांत जो आने वाली है- दूसरा प्रवासी. गप्पांचा ओघ सुरु झाला, सचिवालायाचा स्टैंड केन्हा आला कळल ही नाही. मी बस मधून उतरलो. बरेच दिवसांनंतर डोक्यावरची टोपी काढली व केसांवरून हात फिरविला. कोवळ्या उन्हाचा आस्वाद घेत ऑफिसच्या दिशेने निघालो. रस्त्याचा कडेला असलेल्या सेमलच्या झाडाला कळ्या आलेल्या दिसल्या. झुडपातून चिमण्यांचा चिवचिवाट ऐकू येत होता. साउथ ब्लाकच्या झाडांवर बरेच दिवसांनी माकडांची पिले ही एका झाडावरून दुसर्या झाडावर आनंदाने उड्या मारताना दिसली. प्रफुलित चेहर्याने त्या दृश्याचा आनंद घेऊ लागलो. तेवढ्यात एका सहयोगीने पुकारले – पटाईत साहब, आज बड़े खुश नजर आ रहे हो. मी हसत हसत म्हणालो हाँ संक्रांत आने जो वाली है. संक्रांत आपल्या सोबत शिशिरात वसंताची चाहूल घेउन येते. निराश मनात एक नाव चैतन्य निर्माण करते. आता पुन्हा वसंत बहरणार ही आशा मनात उत्पन्न होते. म्हणूनच आपण संक्रांतिचापर्व साजरा करतो. सर्वांच्या आयुष्यात गोड दिवस येवो म्हणून – तीळ गुळ खा- गोड बोला शेवटी मराठी सृष्टिच्या समस्त परिवाराला संक्रांतिचा शुभेच्छा…
— विवेक पटाईत
Leave a Reply