नवीन लेखन...

संगीताचे जादूगार ओ. पी. नय्यर

ओ. पी. नय्यर यांचे पूर्ण नाव ओंकार प्रसाद नय्यर. त्यांचा जन्म १६ जानेवारी १९२६ रोजी लाहोर प.पंजाब येथे झाला. १९४९ मधे ” कनीज” या चित्रा पासून संगीतकार म्हणून कारकीर्द ओ.पी.नी सुरवात केली पण त्यांचे पहिले गीत गाजले ते चंद्रू आत्मा यांचे प्रीतम आन मिलो. ओपीना या गीतसाठी २५ रू इतके प्रचंड मानधन मिळाले. दलसुख पांचोली यांच्या “आसमान” या चित्रा द्वारा ओ.पीं.चे आगमन हिंदी फ़िल्म संगीताच्या मंचावर झाले खरे पण या चित्रपटासकट ” बाज” व “छम छमा छम” हे त्यांचे चित्रपट तिकिट बारीवर आडवे झाले. मग निराश हौउन पुन्हा पंजाबला परत जावे व शाळेत मिळाली तर एकाद्या संगीत मास्तराची नोकरी करावी या निर्णयाप्रत ओपी आले. उरलेली पंधराशे रुपये गुरूद्त्त कडे मागण्यासाठी ते गेले तेंव्हा “आपल्या मोठ्या मुलाला दूध पाजायला ही पैसे नाहीत” असे त्यानी गुरूदताला सुनावले. तर त्याने काय करावे त्याने आपला आगामी चित्रपट ” आरपार” ओपीना बहाल केला. ओपींकडे काही ” सांगितिक मागण्या” गुरूनी केल्या. नय्यर ” आरपार” मधून एक नवाच बाज फ़िल्म संगीतात घेउन आले. ओपी नय्यर हे चित्रसंगीतातील आद्य ” फ़्युजनिस्ट ” म्हणून उदयास आले.फ़्युजन करतानाही तालांची बेमालूम सरमिसळ करायची व पुन्हा साडेतीन मिनिटाचे गाणे अ पासून ज्ञ पर्यंत एकसंध करायचे ही त्यांची खास स्पेशालिटी ठरून गेली. ओपीं नी १९५२ ते २००७ य काळात एकूण सुमारे ८० चे वर चित्रपटाना संगीत दिले. इतर भाषेतील चित्राना संगीत दिले. तेलगू भाषेतील ” निराजनम ” या चित्राच्या संगीताने रेकॉर्ड विक्रीचा उच्चांक केला. मींड, तान, आंदोलन हे हरकतीचे प्रकार सढळपणे वापरणारे संगीतकार म्हणजे ओपी नय्यरच. मुख्या म्हणजे असे गीत नृत्यगीत असायला पाहिजे असे नाही. कवाली, युगलगीत अशा प्रकारच्या गीतातही हरकतींची भरपूर वापर आढळतो. खरी ओपी नय्यर खासीयत दिसते ती काश्मिरकी कली, मेरे सनम, एक मुसाफ़िर एक हसीना, फ़ि रवही दिल लाया हु, हमसाया, कही दिन कही रात ,द किलर्स ,हम सब चोर है, सी आयडी ९०९, सावनकी घटा व प्राण जाय पर वचन न जाय ई या चित्रपटातून. ओपी ना ” रिदम किंग ” या नावाने ओळखले जाते तसे मायस्त्रो ऑफ मेलडी असे ही म्हटले जायचे. ओ.पी हे सार् पणे स्वता” ला वेगळाच व श्रेष्ठ संगीतकार मानत. संगीतकार घडवून होत नाही तो निसर्गाने जन्मालाच घालावा लागतो असे ते वारंवार म्हणत. सिनेजगतात कॅडिलॉक ही गाडी फ़क्त मा.ओ. पी. नय्यर व मा.व्ही शांताराम यांचेकडेच होती. मा.ओ. पी. नय्यर यांचे २८ जानेवारी २००७ रोजी निधन झाले.

संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ:-इंटरनेट

संजीव वेलणकर
About संजीव वेलणकर 4354 Articles
श्री. संजीव वेलणकर हे पुणे येथील केटरिंग व्यवसायिक असून ते विविध विषयांवर सोशल मिडियामध्ये लेखन करतात. ते १०० हून जास्त WhatsApp ग्रुप्सचे Admin आहेत. संगीत, आरोग्य, व्यक्तिचित्रे, पाककृती व इतर दिन विशेष या विषयांवर फेसबुकवर ही ते नियमितपणे लेखन करत असतात.
Contact: Facebook

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..