दुसरं महायुद्ध, जेव्हा विश्वात अराजकतेचं थैमान आणि अमानुषतेचं काहुर माजलेलं असताना “प्रभात” ने संत ज्ञानेश्वर महाराजांच्या जीवनमूल्यांवर आधारीत आणि त्यांनी दिलेला माणुसकीचा संदेश यातून एका कलाकृती निर्मितीचा निर्णय घेतला, जो पुढे चित्रीत करण्यात आला संत ज्ञानेश्वर या चित्रपटातून. संत ज्ञानेश्वर हा चित्रपट १९४० रोजी प्रदर्शित झाला. अमेरिकेतील चित्रपट महोत्सवात दाखवण्यात आलेला हा पहिला भारतीय चित्रपट ठरला. या चित्रपटाच्या “जाहिराती” साठी सुद्धा अनेक क्लुप्त्या लढवल्या गेल्या. ऑक्टोबर १९४१ रोजी अमेरिकन सिनेमॅटोग्राफनी या चित्रपटाचा वेध घेताना, त्यातील छायाचित्रणाचे कौतुक केले होते. तसेच १९७२ रोजी मुंबई दूरदर्शनच्या माध्यमातून दाखवण्यात आलेला दूरचित्रवाणीवरील हा पहिला मराठी चित्रपट होय.
चला तर मग पाहूया, संत ज्ञानेश्वर हा चित्रपट..
—
Leave a Reply