संत तुकाराम महाराजांच्या सांसारिक आणि प्रापंचिक जीवनाबरोबरच विठ्ठल भक्तीची आस आणि त्यावर अपार श्रध्दा यांवर हा चित्रपट बेतला असून, संत तुकारामांची भूमिका त्याकाळचे प्रसिध्द नाट्य अभिनेते आणि गायक विष्णूपंत पागनीस यांनी साकारली आहे. तर चित्रपटातील गीते शांताराम आठवले यांची असून मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केली आहेत. त्याकाळच्या प्रगत तंत्रज्ञानाचा वापर करून प्रभातने या चित्रपटातील अनेक दृश्यांना आणि प्रसंगांना वेगळ्याच उंचीवर नेलं. त्यामुळे जागतिक स्तरावरही ”संत तुकाराम” या चित्रपटाला वेगळंच परिमाण आणि नावलौकिक मिळालं. १९३७ साली व्हेनिस इथे आयोजित करण्यात आलेल्या ”व्हेनिस फिल्म फेस्टीवल” ला भारताकडून या चित्रपटाची निवड झाली आणि जगातील तीन सर्वोत्कृष्ट चित्रपटांपैकी एक चित्रपट म्हणून ”संत तुकाराम” या सिनेमाचा गौरव झाला.
— मराठीसृष्टी व्यवस्थापन
Leave a Reply