झर झर झर झर विमान चालेल
गर गर गर गर पंखे फिरतील
पळती शहरे पाहूया, मामाच्या लंडनला जाऊया
मामाचे लंडन फारच छान
बंगला, गाडी मोठ्ठा मान
मटारीतून फिरुया, मामाच्या लंडनला जाऊया
मामाच्या गावाला थंडी फार
स्वेटर, कोट, वुली विजार
हिम्मत राखून फिरुया, मराठी बाणा दावूया
गोरी गोरी मामी उर्मट
ईंग्रजीत करेल वटवट
नम्रतेने राहूया, मामाच्या प्रेमाला जागूया
मामी खाते भारीच भाव
रोज रोज आम्हा बिस्किट, मस्का पाव
मामाला मस्का लावूया,लंडन पाहुन घेऊ या
फाड फाड ईंग्रजी मुले बोलती
गावरान इंडियन आम्हा म्हणती
मायबोलि आपली बोलूया, मराठी चा अभिमान राखूया
आजी आजोबांचे संस्कार छान
आई बाबांची शिकवण छान
संस्कारक्षम राहुनिया, भारताची शान वाढवूया
— सौ. सुधा नांदेडकर
Leave a Reply