नवीन लेखन...

सक्रांतीचं अढळपद

दरवर्षी एकाच तारखेला येणारा एकमेव हिंदू सण म्हणजे संक्रांत. यंदाच्या वर्षी ती पंधरा जानेवारीला येत आहे. पण ही तारीख अलीकडची. त्या आधी ती कित्येक वर्षं नेमानं चौदा जानेवारीला येत असे.

वास्तविक आपले सण असे नियमितपणे एका ठराविक तारखेला कधीच येत नाहीत. त्यांच्यात वर्षागणिक बदल होत असतात. मग ती गणेश चतुर्थी असो, दसरा असो, गुढी पाडवा असो की दिवाळी असो. गणेश चतुर्थी ऑगस्ट सप्टेंबरमध्ये कधी तरी येते. यंदा समजा ती तीन सप्टेंबरला आली तर पुढच्या वर्षी त्याच तारखेला येणार नाही. कदाचित सप्टेंबरमध्येच पण नंतरच्या तारखेला येईल. कदाचित ऑगस्टमध्येही येईल. तीच गत दिवाळीची. साधारणपणे ऑक्टोबर-नोव्हेंबर हा तिचा काळ. पण तारीख बदलती. अशी परिस्थिती असताना फक्त मकर संक्रांतच कशी वर्षानुवर्षं एकाच तारखेला येत राहिली आहे? तिच्यात बदल झाला तोही एकाच दिवसाचा. आणि तोही आता काही वर्षं तरी तसाच राहणार आहे. हे कशामुळं होतं? मकरसंक्रांतीमध्येच असं काय वैशिष्ट्य आहे की तिला एकच तारीख धरून ठेवण्यात असं यश यावं? विचारले होते असे प्रश्न कधी आपण? विचारायला हवेत.

पंचांगकत्त्यांनी सांगितलं आणि आपण निमूटपणे पालन केलं. त्यांचं बरोबरही असेल. नव्हे आहेच. पण ते तसं का हे जाणून घेण्याचं कुतूहल आपण जागृत ठेवायला हवं.

असं केलं तर आपल्याला समजून येईल की आपलं भारतीय वर्षं चांद्रवर्ष आहे. म्हणजे ते चंद्राच्या पृथ्वीभोवतीच्या भ्रमणावर अवलंबून आहे. म्हणून तर त्यातले दिवस हे चंद्राच्या वाढत्या किंवा घटत्या कलेवर अवलंबून असतात. पूर्णचंद्र दिमाखात मिरवणारी पौर्णिमा ते चंद्राला तोंड काळं करायला लावणारी अमावास्या यात महिन्याचं पंचांग फिरत राहतं. शिवाय चंद्र आपली पृथ्वीभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण करतो साधारण २९ दिवसांमध्ये. त्यामुळं त्याच्या अशा बारा प्रदक्षिणा पूर्ण झाल्या तर पृथ्वीची सूर्याभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होत नाही. त्यामुळेच त्या प्रदक्षिणेच्या कालखंडावर आधारलेलं कॅलेन्डर आणि चंद्राच्या परिभ्रमणावर आधारलेलं पंचांग यांच्यात तफावत राहतेच. ती तीन वर्षांनी येणार्‍या अधिक महिन्यांनी भरून काढली जाते. आपले सारे सण त्या चंद्राच्या परिभ्रमणाशी जोडलेले. आश्विन महिन्याच्या वद्य चतुर्दशीला दिवाळीचं अभ्यंगस्नान घडायचं. तसंच भाद्रपदाच्या शुक्ल चतुर्थीला मंगलमूर्तीचं आगमन व्हायचं. मग ते सण एकाच तारखेला कसे येतील? पण मकरसंक्रात ही सूर्याच्या मकरराशीच्या प्रवेशावर अवलंबून असते. त्यामुळं तिचा दिवस चंद्राच्या कलेवर अवलंबून नसतो. साहजिकच तिला विवक्षित तारखेच अढळपद मिळतं.

-डॉ. बाळ फोंडके

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..