आपली मुंबई : प्रख्यात वक्ते आणि लेखक श्री सच्चिदानंद शेवडे यांच्या व्याख्यानाचे आयोजन मालाड पश्चिम येथे करण्यात आले आहे. सर्वोत्तम प्रकाशन मुंबई आणि मालाड देवस्थान टअस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत सायंकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजता या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
भारतमातेच्या १२५ वर्षांच्या तेजस्वी स्वातंत्र्यलढ्याची तोंडओळख नवीन पिढीला करुन देण्याच्या हेतूने श्री. सच्चिदानंद शेवडे यांच्या ओजस्वी वाणीतून साकारणारी व्याख्यानमाला सर्वोत्तम प्रकाशन मुंबई आणि मालाड देवस्थान टअस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१३ या कालावधीत सायंकाळी ७.०० ते रात्री ९.०० वाजता श्री. पाटलादेवी मंदिर पटांगण, सोमवार बाजार, मालाड (प). मुंबई ४०००६४ येथे या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे.
व्याख्यानाचे विषय :
२५ डिसेंबर : १८५७ चे स्वातंत्र्यसमर
२६ डिसेंबर : वासुदेव बळवंत फडके
२७ डिसेंबर : चापेकर बंधू
२८ डिसेंबर : मदनलाल धिंग्रा
२९ डिसेंबर : भगतसिंह, राजगुरु, सुखदेव
३० डिसेंबर : नेताजी सुभाषचंद्र बोस
३१ डिसेंबर : विनायक दामोदर सावरकर
व्याख्यानमालेवर आधारित निबंधस्पर्धा :
देशाची तरुण पिढी संस्कारक्षम व्हावी तसेच देशप्रेम व राष्ट्रनिष्ठेची भावना त्यांच्या ठायी प्रेरित होऊन त्यांच्यामधून आदर्श नागरिकांची नवी पिढी निर्माण व्हावी या ध्येयाने व्याख्यानमालेवर निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. शालेय, महाविद्यालयीन आणि खुल्या गटासाठी ही स्पर्धा आयोजिली आहे.
यासाठी दररोज २५ डिसेंबर ते ३१ डिसेंबर २०१३ उपस्थित राहणे बंधनकारक आहे. व्याख्यानमालेतील कोणत्याही क्रांतिकारकावर आधारित स्वतंत्र प्रज्ञेने निबंध लिहावा. यासाठी शब्द मर्यादा किमान १२०० शब्द अशी आहे. निबंध पाठवण्याची अंतिम दिनांक ५ जानेवारी २०१४ राहिल. विद्यार्थ्यांसाठी प्रवेश देणगी आकारण्यात आलेली नाही. मात्र खुल्या गटासाठी रु. ५०/- शुल्क आकारण्यात आले आहे. अधिक माहितीकरिता संपर्क : मालाड देवस्थान ट्रस्ट, दुरद्वनी – ०२२-२८८१७३१०.
— श्री.जयेश शत्रुघ्न मेस्त्री
Leave a Reply