नवीन लेखन...

सजीवांचे जीवनकलह

पृथ्वीच्या पाठीवर प्रारंभापासूनच विविध प्रकारच्या प्राण्यांचा सजीवांचा जीवनकलह सुरू आहे. त्यातून जे वाचले ती आपली सृष्टी. या जीवनकलहाचा प्रवास आणि त्यामागील कारणे सांगणारे उत्तम पुस्तक. ले. गो. बा. सरदेसाई यांनी. पृ. 96 किं. 100 रू. ISBN : 978-93-80232-44-7

सजीवांचे जीवनकलह नचिकेत प्रकाशन, नागपूर यांनी प्रकाशित केलेले गो.बा.सरदेसाई लिखीत छोटेसे पुस्तक अतिशय मोठ्या आणि महत्वपूर्ण माहितीचा खजिना आहे. अगदी प्राथमिक स्तरापासून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत सजीवांच्या जीवनशैलीत घडणारे बदल विषयनिहाय समाविष्ट केले आहे.

विद्यार्थी, हौशी निसर्ग अभ्यासक, यांना ही माहिती अतिशय महत्वाची आहे. पृष्ठ क्रमांक 12, 20, 24, 32, 98 वर दिलेली प्रजातीची माहिती अतिशय महत्वपूर्ण आहे परंतु बर्‍याच ठिकाणी माहितीचे पुर्नमुद्रण झाले आहे. सदर पुस्तकात स्थानिक स्तरावरील माहितीवर भर देणे गरजेचे वाटते. तसेच काही इंग्रजी शब्द जसेच्या तसेच देवनागरी मध्ये लिहिले आहे. त्यामुळे सामान्य वाचकाला अर्थबोध होण्याकरिता अडचण जाते. (उदा. फिलीड, प्रायमेटस्‌, प्राईग्रा) त्याचप्रमाणे खालील शब्दाचे मराठी मध्ये स्पष्टीकरण आवश्यक वाटते. भेक, शरंड, ब्रिटनमधील गोधा, कुंपण डुक्कर, जरायुजी साप, व्हीजल इत्यादी.

बर्‍याच ठिकाणी काही हा शब्द वेगवेगळ्या प्रजातीचा उल्लेख करताना आला आहे. त्यामुळे सदर माहिती विशिष्ट प्रजातीतील जीवनकलहांची असताना सुद्धा मोघम आहे. असे वाटते.

संपूर्ण पुस्तकाची रचना अतिशय उत्कृष्ट आहे. वनस्पती, पक्षी, शाकाहारी, मांसाहारी प्राणी आणि मानव ह्याचा अतिशय उत्तम मेळ घातला आहे. ब्रह्मांडातील पंचमहाभूताना दृष्य स्वरूपात पहायचे असेल तर जल, जमीन, जंगल, जनावर आणि जनजीवन ह्या पाच प्रमुख घटकांना एकत्र कसे जोडायचे, ते या पुस्तकाच्या वाचनातून सहजपणे लक्षात येते.

प्रा. विजय घुगे सजीवांचे जीवनकलह लेखक : गो. बा. सरदेसाई पाने : ९६, किंमत : १०० रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130

— मराठीसृष्टी टिम

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..