नवीन लेखन...

सण आणि सौंदर्य

सामान्यतः महत्वाचे सणाच्या दिवसांमध्ये बहुतांश लोक एवढे बिझी असतात की, त्यांना या सणामध्ये सुंदर दिसण्यासाठी आणि तासंतास पार्लरमध्ये बसण्यासाठी वेळच मिळत नाही. तुमच्या समोरही हीच समस्या असेल तर आज आम्ही तुम्हाला झटपट चेहरा उजळवणारे काही निवडक नैसर्गिक उपाय सांगत आहोत.

1. तुमच्या चेह-यावर सुरकुत्या पडल्या असतील तर केळी तुमच्यासाठी उत्तम पर्याय आहे. पिकलेले केळी मॅश करून चेह-यावर १५ मिनिट लावून ठेवल्यास चेह-यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते. चेहरा धुतल्यानंतर रक्तचंदनाचा लेपही लावा. या उपायाने चेहरा उजळ होण्यास मदत होईल.

2. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन आणि अँटीऑक्सीडेंट भरपूर प्रमाणात आढळून येतात. पिकलेली स्ट्रॉबेरी मॅश करून चेहऱ्यावर लावा आणि 15 मिनिटानंतर चेहरा धुवून घ्या. हे चेहऱ्यासाठी टॉनिकप्रमाणे काम करते. या उपायाने रंग गोरा होतो.

3. चेहर्‍याच्या सुंदरतेसाठी दोन चमचे टोमॅटो रस आणि अर्धा चमचा मध एकत्रित करून हे मिश्रण चेहर्‍यावर लावा. २० मिनिटांनी चेहरा धवून घ्या. या उपायाने चेहरा उजळ दिसेल.

4. अनेक प्रातांमध्ये लोक मधाचा वापर करून फेसपॅक तयार करतात. तज्ज्ञांच्या मतानुसार बेसन, मध, ऑलिव्ह, दुधाची साय एकत्र करून तयार केलेला फेसपॅक प्रभावी टॉनिकप्रमाणे काम करतो.

5. फेसपॅक तयार करण्यासाठी ३ चमचे बेसन पीठ, मध, दुधाची साय आणि ऑलिव्ह तेल १-१ चमचाभर मात्रेत घेऊन एकत्र करून घ्या. हे मिश्रण २० मिनिट चेहर्‍यावर लावून ठेवा, त्यानंतर चेहरा स्वच्छ धवून घ्या.

6. दक्षिण भारतातील महिला रक्त चंदन नारळाच्या मलईमध्ये मिसळून चेहर्‍यावर लावतात. दक्षिण भारतीय या मिश्रणाला त्वचेसाठी खूप लाभदायक मानतात.
7. हिमाचल प्रदेशातील महिला चाहेर्यासाठी सफरचंदचा वापर करतात. यांच्या मतानुसार सफरचंद ज्यूस चेहर्‍यावर लावल्यास चेहर्‍यावरील काळे डाग दूर होतात. याच्या नियमित वापरणे चेहरा उजळतो.
8. दोन चमचे मध आणि एक चमचा लिंबाचा रस एकत्रित करून घ्या. हे मिश्रण चांगल्या प्रकारे चेहर्‍यावर लावा. २० मिनिटांनी चेहर्‍यावरील हे मिश्रण ओल्या कापसाने स्वच्छ करून घ्या. या उपायाने त्वचा सॉफ्ट आणि स्मूथ होईल.

9. कोरफडीच्या पानांचा रस काढून त्यामध्ये लिंबाच्या रसाचे काही ठिंब टाका. हे मिश्रण चेहरावर लावून वाळल्यानंतर चेहरा धुवून घ्या.

10. चेहरा आणि ओठांवर साजूक तूप किंवा लोणी लावल्यास चेह-यावर चमक येईल. किमान तासभर हा लेप चेह-यावर लावून ठेवावा. यामुळे चेहरा आणि ओठ अतिशय मऊ आणि चमकदार होईल.

तेलकट त्वचेकरीता उपाय

1 चमचा दही, 1 चमचा बेसन, चिमुटभर हळद व 2-4 थेंब लिंबाचा रस टाकून घट्ट लेप तयार करून शरीरावर लावा. या उपायाने त्वचा निरोगी राहील आणि उजळेल.

100 ग्रॅम हळकुंड रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा. सकाळी बारीक करून पेस्ट तयार करा. हे उटणे थंडीपासून रक्षण करण्यासाठी आणि कांतीसाठी उपयुक्त आहे.

थोडेसे दही घेऊन त्यामध्ये ८-१० तुळस किंवा लिंबाच्या पानांची पावडर मिसळून पेस्ट तयार करून चेहऱ्यावर लावा. या उपायाने वारंवार चेहऱ्यावर येणारे पुरळ, फोडं यापासून मुक्तता मिळेल.

एक चमचा गव्हाचे पीठ, तांदुळाची पेस्ट, ५-६ पुदिन्याचे पानं आणि ५ गुलाबाच्या पाकळ्या एकत्रितपणे कुटून एकजीव करा. या उपायाने त्वचा कोमल होईल.

रुक्ष त्वचेकरीता उपाय

थोडेसे तीळ दुधामध्ये रात्रभर भिजवून ठेवा. सकाळी यामध्ये चिमुटभर हळद टाकून बारीक कुटून पेस्ट तयार करा. हा लेप त्वचेवर लावल्यास त्वचा तजेलदार होईल.

२ बदाम आणि एक चमचे बेदाणे रात्री दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी पेस्ट करून चेहऱ्यावर लावा.
एक चमचा तांदुळाचे पीठ, 1 छोटा चमचा मध आणि 1 चमचा गुलाबपाणी एकत्र करून पेस्ट तयार करा. या उपायाने त्वचा मुलायम होईल.

एक चमचा उडदाची डाळ न तापवलेल्या दुधामध्ये भिजवून ठेवा. सकाळी याची पेस्ट तयार करून यामध्ये थोडेसे गुलाबपाणी टाकून चेहऱ्यावर लावा.

एक चमचा दही आणि 1 चमचा बेसन पिठामध्ये गुलाबपाणी मिसळून त्वचेवर लावल्यास मृत त्वचा निघून जाईल.

केळ बारीक करून त्यामध्ये एक चमचा बेसन पीठ मिसळुन हे मिश्रण त्वचेवर लावल्यास टॅनिंगची समस्या दूर होईल.

सौजन्य
डाँ..घोसाळकर
7798617222

`आरोग्यदूत ७’ या WhatsApp ग्रुपवरुन साभार 

Avatar
About आरोग्यदूत व्हॉटसअॅप ग्रुप 118 Articles
आरोग्यदूत हा वैद्य सुविनय दामले यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्यविषयक बहुमोल माहितीची देवाणघेवाण करणारा एक अतिशय लोकप्रिय व्हॉटसअॅप ग्रुप आहे. या ग्रुपवरील निवडक पोस्ट वाचकांच्या सोयीसाठीप प्रकाशित करत आहोत.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..