भटकत जातो वाटसरू तो, जंगलामधील अज्ञात स्थळी
आंस लागते जाण्याकरिता, दूरवरच्या दिव्या जवळी…१,
मार्ग जाण्याचे ज्ञात नसूनी, निराशेने वेळ दवडितो
ध्येय दिसत असून देखील, मार्गामुळे अडून पडतो…२,
अज्ञानाच्या अंधारात आम्हीं, शोधत असतो असेच त्याला
मार्ददर्शन ते सद्गुरुचे, न लाभता ध्येय मिळे कुणाला…३,
वाट दाखवी सद्गुरु आम्हां, प्रभूचरणी त्या जाण्याचा
दुवा साधतो आमच्यामध्ये, त्यात एकरूप होण्याचा…४
— डॉ.भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply