‘आनंदवनाच्या निर्मितीत बाबा आमटे यांना त्यांच्या पत्नीची साधनाताईंची फार मोलाची साथ लाभली होती. त्यामुळे उद्दिष्टपूर्तीसाठी त्यांनी केलेल्या ‘साधने’त कोठेही खंड पडला नाही. साधनाताईंनीही अगदी मनापासून बाबांच्याप्रमाणेच या कार्यात स्वतःला वाहून घेतले. साधनाताई आमटे म्हणजे पूर्वाश्रमीच्या इंदू घुले. आमटे व घुले परिवाराचे मित्रत्वाचे संबंध होते. बाबा आमटे यांच्या कलंदर वृत्तीची साधनाताईंना प्रथमपासूनच कल्पना होती. परंतु चाकोरीबाहेर जीवन जगणाऱ्या व काही तरी वेगळे करून दाखविण्यासाठी जिद्द असलेल्या या तरुणाबद्दल त्यांना आकर्षण होतेच. प्रत्यक्ष विवाहाच्या वेळीं बाबांनी त्यांना ‘तुझे एका वादळाशी लग्न झाले आहे’ असे स्पष्टपणे सांगितले होते. परंतु साधनाताईंनीही पूर्ण विचारांनीच त्यांच्यासारखा जोडीदार स्वीकारला होता. त्यामुळे पुढे बाबांच्या प्रत्येक कार्यात त्यांनी त्यांना मनापासून साथ केली. कुष्ठरोग्यांची मुले जेव्हा स्वतःच्या घरात ठेवण्याचा निर्णय घेतला तेव्हा साधनाताईंनी त्या मुलांना स्वतःच्या मुलासारखी वागणूक दिली. एक दिवस रड्याच्या कडेला टाकून दिलेल्या एका ताज्या मुलीला घेऊन कोणीतरी आश्रमात आले व साधनाताईंनी त्या मुलीला स्वतःच्या फरात घेतले. तिचे नाव ‘ धरती’ असेच ठेवले व तिला मायेची ऊब दिली. दुर्देवाने ती मुलगी फार काळ जगली नाही; मात्र अनाथ मुलांसाठी ‘गोकुळ प्रकल्प सुरू करण्याचे ती प्रेरणास्थान ठरली. ‘गोकुळमधील अशा अनेक अनाथ मुलांना साधनाताईंनी आईचे प्रेम दिले. अशा मुलांबरोबर शिकून माझी मुले मोठी झाली व बाबांचे समाजकार्य त्यांनी नेटाने पुढे चालविले आहे, असे साधनाताई मोठ्या अभिमानाने सांगत.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य
राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत
अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...
अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर
अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
Leave a Reply