सांगायलाच ह्वंय, असं नाही… हा भगवान निळे यांचा सृजन प्रकाशनचा नुकताच प्रकाशित झालेला कवितासंग्रह वाचला.
मी म्ह्णजे, तुम्हीही! या पहिल्याच कवितेत कवी सर्वसामान्य लोकांच प्रतिनिधित्व करताना दिसतो. तेव्हाही आजच्यासारखे… ही कविता अजूनही आपल्या समाजव्यवस्थेत फार आशादायी असे बदल झालेले नाहीत हे पटवून देते . अशी कित्येक वर्षे लोटतील या कवितेतून कवीने आपण आजही कसं भीतीच्या सावटाखाली जीवन जगत आहोत हे नवरा- बायको संबंधाच्या माध्यमातून उत्तमरित्या पटवून दिले आहे.
सर्पमिठी ही कविता स्त्री-पुरूष समानतेवर भाष्य करते. आरस्पानी बाई या कवितेत नवर्याच्या कुशीतील आपल्या पत्नीकडेही नवरा आजही फक्त एक बाई म्ह्णूनच पाह्त असतो हे सत्य उत्तमरित्या मांडताना दिसते. कोण हा पुरुष सारख्या काही कविता पुरुषातील पुरूष नाही तर माणूस शोधण्यास प्रवृत्त करताना दिसतात. सत्यामागे दडलेले सत्य सारख्या कविता अश्लीलता ही पाह्णार्याच्या डोळयात दडलेली असते हे सत्य उगडपणे पटवून देते. पुरूषांच्या सावलीमागे लपलेल्या बायका ही कविता आजही स्त्री पुरूषाचाच आधार शोधत असते हे सत्य मांडताना दिसते.
दोन चेहरे मुंबई नगरीचे या कवितेत एकाच नाण्याच्या दोन बाजू पण त्या दोन बाजूत असणारा पराकोटीचा विरोधाभास कवीने अप्रतीम मांडला आहे. असं का होतं? या कवितेत आजचा माणूस कसा सुखाला पोरका झालेला आहे हे सांगण्याचा कविचा प्रयत्न यशस्वी झालेला दिसतो. पाच तुकडे प्रार्थनेचे या कवितेत कवी आजही समाज मनात रुतून बसलेल्या अंधश्रध्देवर भाष्य करताना दिसतो. माझाही बाप आणि आई गेल्यानंतर या कविता आई बापावर त्यांच्यातील नाते- संबंधावर फार दाह्कपणे पण वास्तववादी भाष्य करताना दिसतात. मुलगी मोठी होते तेव्हा… या कवीतेत कवी बाप-मुलीच्या नातेसंबंधाची एक झाकलेले बाजू मांडण्याचा प्रयत्न करताना दिसतो. या कवितासंग्रहातील मी मरेन तेंव्हा … या शेवटच्या कवितेत कवी जगातील नश्वरता मांडताना दिसतो…
भगवान निळे यांच्या सांगायलाच ह्वंय असं नाही… या कवितासंग्रहातील प्रत्येक कविता एक सुविचार आहे असं म्हटलं तर ते वावगे ठरणार नाही. प्रत्येकाने वाचावा असा हा कवितासंग्रह आहे मी वाचला आता तुम्हीही वाचा वाचल्यावर तुंम्ही नक्कीच म्ह्णाल की सांगायलाच ह्वंय, असं नाही…
— निलेश बामणे
Leave a Reply