ब्रिटन मधील हरफोर्डशायर येथे ‘ऑन वे’ या नावाचे गाव असून हे गाव पुस्तकाचे गाव म्हणून ओळखले जाते. त्याच पध्दतीने महाराष्ट्रातही, स्ट्रॉबेरीसाठी प्रसिद्ध असणारे महाबळेश्वर तालुक्यातील भिलार हे गाव आता ‘पुस्तकाचे गाव’ या रूपाने वाचन संस्कृतीसाठी समृद्ध झाले आहे. देशातील हा पहिला महाराष्ट्र शासनाने राबवला असून या प्रकल्पामुळे महाबळेश्वर तालुक्याचा देशात नावलौकिक उंचावला आहे. या योजनेंतर्गत भिलारमधील नव्या भूखंडावर सुमारे साडेतीन एकरावर हे ‘पुस्तक गाव’ विकसित करण्याची योजना आहे. यामध्ये विविध प्रकारची साहित्य दालने असतील. त्यात शेती, स्पर्धा परीक्षा याचीही माहिती यातून मिळेल. अत्याधुनिक दृकश्राव्य दालनात ई-बुक्स व आॅडिओ बुक्सही उपलब्ध असतील. तसेच या योजनेत निवडलेल्या घरांमध्ये विविध प्रकारची पुस्तके ठेवली गेली असून, त्याद्वारे वाचनसंस्कृती जोपासण्याचा प्रयत्न केला आहे. त्या घरांमध्ये तसे पूरक वातावरण तयार केले केले गेले आहे.
‘पुस्तकाचे गाव’ या प्रकल्पाची वैशिष्ट्ये…
साहित्यिकांच्या भेटीद्वारे रसिकांशी सातत्यपूर्ण संवाद लेखन, वाचन, संपादन, मुद्रितशोधन याबाबत प्रशिक्षण कार्यशाळा होतील शैक्षणिक सहलींसाठी अनुकूल वातावरण, साहित्यिकांच्या भेटी ठरवता येतील. गावात कायमस्वरूपी कविकट्टा व अभिवाचन कट्टा असेल गावातील सार्वजनिक जागा ग्रामपंचायत, समाजमंदिर, शाळा येथे वाचनकट्टे तयार करण्यात येणार आहे.
घरांचे वाचनालय.. गावाचे ग्रंथालयात रूपांतर…
महाराष्ट्र शासनाने भिलार या गावाला या पायलट प्रोजेक्टसाठी निवडले असून, यासाठी ग्रंथालय, पुस्तके व यासाठी लागणाऱ्या सर्व सुविधांसाठी आर्थिक तरतूद केली आहे. या माध्यमातून भिलारकडे उच्च दर्जाचे क्षेत्र म्हणून पाहिले जाणार आहे. तर रोजगार व आर्थिक स्थैर्य ही लाभणार आहे. त्यामुळे भिलारमधील घरांचे छोट्या वाचनालयात तर गावाचे मोठ्या ग्रथांलयात रूपांतर झाले आहे.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट
Leave a Reply