नवीन लेखन...

सात त्रिक्रम आणि बोथमचे पुनरागमन



21 ऑगस्ट 1914 हा आहे डग्लस विविअन पार्सन राईटचा जन्मदिवस. प्रथमश्रेणी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा त्रिक्रम घडविण्याचा विक्रम डग्लसच्या नावावर आहे. 497 प्रथमश्रेणी सामन्यांमधून 2,056 बळी घेताना त्याने एकूण सात वेळा त्रिक्रम रचलेला आहे. कसोट्यांमध्ये त्याने 34 सामन्यांमधून 108 बळी मिळवलेले आहेत. खासियत प्रत्येक बळीमागे तब्बल 39.11 धावा मोजणे. खराब चेंडू सतत टाकण्याची खराब सवय त्याला होती.

21 ऑगस्ट 1986

मरिवान्हा या मादक आणि उत्तेजक द्रव्याचे सेवक केल्याबद्दल मिळालेली बंदीची शिक्षा भोगून ‘बीफी’ इअन बोथम ओवलवरील न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्याद्वारे कसोटीविश्वात पुन्हा प्रवेशता झाला. आपल्या पुनर्प्रवेशानंतरच्या पहिल्याच चेंडूवर बीफीने ब्रूस एडगरला झेलबाद केले आणि सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या डेनिस लिलीच्या (तत्कालीन) विक्रमाशी बरोबरी केली. ग्रॅहम गूच त्याला खोचकपणे आणि मार्मिकतेने विचारला झाला, “अरे बीफी, तुझ्या संहिता (स्क्रिप्ट्स) लिहिते कोण?” नाटक-सिनेमांमधील कलात्मकता आणि आकर्षकता टिकून रहावी म्हणून साहित्यिकांकडून काळजीपूर्वक तिच्या संहिता लिहिल्या जातात. इथे गूचला बोथमची ही ‘कलाकारी’ दाखवायची आहे. याच दिवशी जेफ क्रोला पायचित पकडून बोथमने त्याचा कारकिर्दीतील बळी क्र. 356 मिळवला आणि लिलीचा विक्रम मोडला. इंग्लंडच्या पहिल्या डावात त्याने अवघ्या 36 कंदुकांवर नाबाद 59 धावाही तडकवल्या. 15 ऑगस्टच्या किश्श्यातील फ्रेड ट्‌रूमनचा ’थकलेला’ संघभाऊ दुसरा-तिसरा कुणी नव्हता. 15 ऑगस्ट 2010ला मी घेतलेले एक स्वातंत्र्य आज संपुष्टात येत आहे. झां झ्याक रूसोने म्हटल्याप्रमाणे मनुष्य खरोखरच स्वातंत्र्याची शिक्षा भोगणारा प्राणी आहे काय?

— डॉ. आनंद बोबडे

Avatar
About डॉ. आनंद बोबडे 232 Articles
सोलापूर येथील डॉ. वैशम्पायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएस. क्रिकेटमधील विक्रम, मराठी-इंग्रजी शब्दकोडी, साहित्य व साहित्यिकांवरील लेख, महफिल-ए-ग़ज़ल हे सदर सोलापरच्या दैनिक संचार मध्ये गाजले. "जागत्या स्वप्नाचा प्रवास - सचिन तेंडुलकर १९८९ ते २०१०..." हे सचिनच्या कामगिरीचा सर्वांगीण आढावा घेणारे पुस्तक (पूजा प्रकाशन, ठाणे).

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..