१.साथ तुझी सुटणार नाही,
तु दे अथवा देऊ नको,
प्रेमाची मज फुंकर घालुन,
दुर निघोनिया जाऊ नको,
पाहीन निरंतर ड़ोळ्यात तुझ्या,
असेल ती जादु आणि नशा,
तुच सोबती माझी,
आणि मीच तुझा वेड़ा सखा.
२.तुझ्या प्रितिचे हेच गाणे,
गाईन मी ह्रदयासवे,
देईन हाक ह्रदयस्पर्शी तुजला,
हातात हात तु देशील का,
पाहता तुज मी सुखावलो,
नयनी माझ्या येशील का,
तुझे ते राणी गोड़ हसणे,
पाहता मज मनी लाजणे.
३.गणेशा गाईन मी तुझे गाणे,
तुझ्या क्रुपेने जळती पापे,
तुझ्या क्रुपेने हरती दुखे,
तुच देवा सखा सोबती,
आणिक नाही माझे कोणी,
तुझ्याच चरणी लागो हे माझे मन,
भक्ताला तु देई हेची धन.
— प्रमोद पाटील
Leave a Reply